चुलत्याला केला जीवे मारण्याचा प्रयत्न…! या पक्षाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल…

Ahilyanagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील मनसे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर (रा.एकनाथवाडी ) यांच्यावर त्यांचे चुलते दिनकर नाना खेडकर यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत दिनकर खेडकर यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्याद म्हटले आहे कि, वसंतराव नाईक नागरी सह. पतसंस्था खरवंडी या संस्थेचा सध्या मी चेअरमन आहे. माझा पुतण्या देविदास लिंबाजी खेडकर याने वसंतराव नाईक खरवंडी या संस्थेचे कर्ज घेतलेले आहे.

कर्जाची परतफेड न केल्यामुळे यांचे घराचे जप्ती आदेश काढलेले आहे. त्यामुळे पुतण्या देविदास हा मला नेहमी म्हणतो की तुमच्यामुळेच माझ्या घराची जप्ती आदेश झाले आहेत. असे म्हणून नेहमी शिविगाळ दमदाटी करत असतो.

याच कारणामुळे दि.२९ सप्टेंबर रोजी सकाळी दिनकर खेडकर हे एकनाथवाडी येथुन मोटारलसायकलवरून मुंगसवाडे हायस्कुलचे समोरुन खरवंडी ते मुंगसावडे रोडने खरखंडीकडे जात असतांना समोरुन देविदास खेडकर याने त्याच्याकडील चारचाकी गाडीने जोरात धडक देवुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेमुळे मोटारलायकलसह रोडच्या साईटच्या खड्यात दिनकर खेडकर पडले. त्यांनतर दिनकर खेडकर त्यांची पत्नी हे गावात पुतण्या देविदास याचे घरासमोर जावुन देविदास याला विचारले की तु माझ्या मोटारलायकलला धडक का दिली. यावेळी त्याने माझ्या घराची जप्ती आणली तुला जीवे ठार मारायचे आहे.

असे म्हणून राग येवून पुतण्या देविदास व शहादेव रावसाहेब खेडकर व इतर तीन अनोळखी इसम यांनी शिविगाळ करून लाथाबुक्याने दिनकर खेडकर यांना मारहाण केली.

पत्नी सोडवासोडव करण्यासाठी मध्ये आली असता तीला पुतण्या देविदास याने लाकडी काठीने मारहाण केली. थांबा हिला जिवेच मारुन टाकतो असे म्हणुन देविदास याने पत्नीचा जोरात गळा दाबुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

अशी फिर्याद दिनकर खेडकर यांनी दिली असून देविदास लिंबाजी खेडकर,शहादेव रावसाहेब खेडकर दोन्ही रा. एकनाथवाडी तसेच इतर एक अनोळखी इसम यांचे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe