२१ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : वाहतुकीदरम्यान सीएट कंपनीच्या टायरची परस्पर विक्री करणाऱ्या चालकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.धुळे येथे ही कारवाई करण्यात आली.
इरशाद निशार अहमद (वय ५५, रा.रामपुर कुमियान, प्रतापगड, उत्तखदेश) असे आरोपीचे नाव आहे.मोहमंद मुस्ताफा (रा.मेन रोड, श्रीवाचूर, पेरेबलोर, तामिळनाडू) यांनी परकोट मारिटिमा एजन्सी या कंपनीमार्फत कंटेनरद्वारे (पीबी-१३-एडब्लू-५०६४ ) सीएट कंपनीचे टावर हल्लेल (गुजरात) येथून होसूर तामीळनाडू येथे मागवलेले होते.
कंटेनरवरील चालकाने टायरची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावली व रिकामा कंटेनर जातेगाव शिवार (ता.पारनेर) येथे उभे केला होत.याबाबत सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.संशयित आरोपी इरशाद निशार आहमद हा धुळ्यात असल्याचे समजताच पथकाने त्याला धुळे शहरातून ताब्यात घेतले.
त्याने त्याचा साथीदार जावेद उर्फ जोसेफ शेख (रा.राणीगंज, जिप्रतापगड, उत्तरप्रदेश (पसार), जावेदवा मित्र अन्सार (पसार) यांच्या समवेत अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शहा (रा. धुळे) याला ८२ टायर्स विकले.तसेच ट्रकमधील उर्वरीत टायर्स हे अहिल्यानगर जिल्ह्यात विक्री केले.
अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शहा याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले.त्याने रोडने जाणाऱ्या ट्रकला वेळोवेळी टायर विकले व उर्वरीत टायर्स हे अनिस हयात खान (रा. रमाबाई आंबेडकरनगर, गल्ली नं.९, देवपूर, धुळे) यांच्या दुकानाच्या जागेत ठेवल्याचे सांगितले.पथकाने अनिस हयात खान याच्या दुकानासमोर ठेवलेले सीएट कंपनीचे १२ टायर जप्त केले आहेत.