Ahmednagar Crime : हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

Published on -

Ahmednagar Crime : हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्या दोघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नदिम सत्तार चौधरी (वय ३०) व अन्सार सत्तार चौधरी (दोघे रा. नायकवाडी मोहल्ल्त्र, ता. नेवासा, जि. अ.नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सदरील दोन्ही आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तथापि आरोपी नायकवाडी मोहल्ला परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त होताच त्या ठिकाणी छापा टाकून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर,

पोहेकॉ. मनोहर गोसावी, पोना. संदीप दरंदले, पोकॉ. सागर ससाणे, रोहित येमूल, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

नदिम चौधरीविरुद्ध ९ गुन्हे

हद्दपारीच्या आदेशाचा भंग करणारा नदिम सत्तार चौधरी याच्याविरुद्ध ९ वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. श्रीरामपूर १ तर नेवासा पोलिस ठाण्यात ८ गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत तर अन्सार सत्तार चौधरी याच्याविरुद्धही नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe