श्रीगोंदा : विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी उपाशी ठेवत बेदम मारहाण, शिवीगाळ करत जिवंत ठार मारण्याची धमकी देत पिडीत महिलेला सासरा आणि दिर यांनी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
तसेच पिडीत महिलेच्या पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरा आणि दिर या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर हे करत आहेत.
या बाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार पिडीत फिर्यादी या सासरी नांदत असतांना फिर्यादीच्या पतीने फिर्यादीचे इच्छेविरुध्द अनैसर्गिग संबंध ठेवले तसेच सासरे आणि दिर यांनी शरीरसंबंध ठेवण्याच्या उद्देशाने फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच फिर्यादीची सासु यांनी तुझा नवरा, सासरा, दिर यांचेपैकी कोणाही बरोबर संबंध ठेवुन मुल पैदा कर असे म्हणाली, त्यास फिर्यादीने नकार दिला असता.
फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण करत फिर्यादीस उपाशीपोटी ठेवुन तु जर तसे केले नाही तर तुला आम्ही नांदवणार नाही, तुला जिवंत ठार मारुन टाकु अशी धमकी दिली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरा आणि दिर या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर हे करत आहेत.