Ahmednagar News : जुन्या भांडणाच्या कारणावरुन दोन गटात वाद झाल्याने एकाने लोखंडी कोयत्याने मारहाण केल्याने एका गटाचे पाच जण जबर जखमी झाले. या घटनेतील आरोपीला पोलीस पकडून घेवून जात असतांना दुसऱ्या गटातील एकाने हल्ला केल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचे दोन बोटे तुटल्याची घटना कोळगाव ता. शेवगाव येथे घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कोळगाव येथे दोन गटामध्ये तुंबळ हाणारी झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळाली. त्यांनी त्वरीत सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.पोलीस कर्मचारी नाकाडे व सहकारी संदिप उबाळे दोघे जण आरोपी अण्णा खंडागळे यास पकडून गाडीकडे घेवून जात होतो.
त्याच वेळेस अर्जुन विठ्ठल खंडागळे याने त्याला सोडा मी त्याला जीवे ठार मारणार आहे. असे म्हणत त्याच्याकडील कोयत्याने अण्णा खंडागळे याच्यावर वार केला. मात्र तो त्याला न लागता पो.काँ. संदीप उबाळे यांच्या हाताच्या बोटावर लागला.
यामध्ये त्यांची दोन बोटे तुटली असून ते गंभीर जखमी झाले. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी आरोपी अर्जुन खंडागळे यास कोयत्यासह तर ज्ञानेश्वर रामा खंडागळे (वय-२०) व अण्णा खंडागळे यांस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.