या तालुक्यात १० वर्षीय मुलींबाबत घडला भलताच प्रकार; मुलीचे नशीब बलवत्तर नाहीतर….

Ahmednagarlive24 office
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Crime :- मुलींबाबत गैरवर्तनाचे प्रकार काही थांबताना दिसत नाहीत. असाच पाथर्डी तालुक्यामध्ये १० वर्षीय शाळकरी मुलीला किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला.
मुलगी साक्षी( वय १०) अर्जुन नागरगोजे ही पाथर्डी येथील श्री स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्या मंदिर
(Sri Swami Vivekananda Primary Vidya Mandir) या शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे. ती नेहमीप्रमाणे २ मार्च रोजी शाळेत गेली होती.

शाळा सव्वा चार वाजता सुटली. शाळा सुटल्यानंतर मुलगी वॉशरूम मध्ये गेली. ती ज्या वेळेस बाहेर आली त्यावेळेस तिथे अंगामध्ये एक लाल शर्ट, काली पॅन्ट घातलेला आणि तोंडाला काळा रुमाल बांधलेला व्यक्ती आला. त्याने तिला सांगितले आम्ही चार जण आहोत मी सांगेन तिकडे जायचं नाहीतर घेऊन पळून जाऊ.

घाबरलेल्या अवस्थेतील मुलगी त्याने सांगितले तसे ऐकत साक्षी नागरगोजे, बाबूजी आव्हाड कॉलज कॅन्टीनच्या पाठीमागील बाजूस गेली. तेथे त्याने मुलीचे तोंड दाबून एक व्हिडिओ कॉल करून तिच्या समोर मोबाईल धरून काही काळ दुसऱ्या व्यक्तीबरोबर संवाद केला.

ज्या ठिकाणी प्रकार घडला त्या ठिकाणी कॅमेरा लावलेला होता. त्याच्या कॉल संपला आणि त्याचे कॅमेऱ्याकडे लक्ष्य जाताच त्याने तेथून धूम ठोकली. घाबरलेल्या अवस्थेत मुलगी रडत कॉलेज कँटीन मध्ये आली आणि तिने घडलेला प्रकार कँटीन मालकाच्या मोबाइल वरून वडिलांना सांगितला.

वडिलांनी जवळच्या नातेवाइकांना तात्काळ फोन करून कँटीन मध्ये जाण्यास सांगितले. मुलीच्या नातेवाइकांना मुलगी तिथे पाहून सर्वानी सुटकेचा निःश्वास टाकला. सुदैवाने मुलीचे नशीब बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला.

घडलेल्या प्रकारामुळे अनेक शंका उपस्थित होत आहेत. त्याला दुसऱ्या कोणाला किडन्याप(Kidnap) करायचे होते की काय ? कॅमेऱ्यात चित्रीकरण कैद झाले म्हणून सोडून दिलेकी काय ? घडलेल्या प्रकारामुळे तालुक्यात घबराटीचे वातावरण झाले आहे.

सदरील घटनेची फिर्याद अर्जुन नागरगोजे यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये ४ मार्च रोजी दुपारी १ वाजता दिली. घटनेचा अधिक तपास सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अधिकारी सुभाष चव्हाण करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe