शिकारी स्वतः शिकार होतो तेव्हा…! पोलिस स्टेशनच्या परीसरातच लाच स्वीकारताना पोलिस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

Published on -

Ahilyanagar News: जमिनीच्या वादातून दाखल झालेल्या राईटच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी सात हजार रुपये लाच स्वीकारल्या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना घडली गुरुवारी संध्याकाळी घडली. पोलिस कर्मचारी संतोष फलके याच्या विरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दिनांक २७रोजी  सायंकाळी शहर बिटचे काम पाहत असलेले   पोलीस कर्मचारी संतोष फलके यांना सात हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक च्या पथकाने ताब्यात घेतले. श्रीगोंदा शहर पोलीस बीटचे काम पाहणारे पोलीस कर्मचारी संतोष फलके यांना शहरातील एक गुन्ह्यात तक्रारदार यांच्याकडे पैश्याची मागणी केली होती  यात तडजोडी नंतर ठरलेली रक्कम स्वीकारताना फलके यांच्यावर पथकाने कारवाई केली  .

पोलीस कर्मचारी फलके यांनी तक्रादार यांच्याकडे मागितलेल्या रकमेपैकी  सात हजार रुपयांची लाच घेताना हा पोलीस कर्मचारी रंगेहाथ सापडला  मारामारीच्या गुन्ह्यात जमीन करून देण्यासाठी ही लाच तक्रार दाराकडे मागितल्याची प्राथमिक माहिती आहे तक्रार दाराकडून लाच स्वीकारताना सायंकाळी पोलीस स्टेशनच्या परिसरात या कर्मचाऱ्याला पकडण्यात आले. पोलीस स्टेशनच्या आवारातच लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe