पोलीस प्रशासन झोपेत मात्र चोरांची नजर करडी ; दिवसाढवळ्या होत आहेत…

२७ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : अहिल्यानगरहून श्रीरामपूर येथे पेन्शनचे पैसे घेण्यासाठी आलेल्या एका वृद्ध महिलेची पर्स येथील बस स्थानक परिसरात चोरून त्यातील ३० हजार रूपये लंपास केल्याची घटना नुकतीच घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेबी हिरामण पवार (वय ६०, हल्ली रा. केडगाव, अहिल्यानगर), मुळ रा. दत्तनगर, श्रीरामपूर, या महिलेचे पती श्रीरामपूर पालिकेत नोकरीला होते.ते मयत झाल्याने त्यांच्या पेन्शनवर सदर महिलेची उपजिविका आहे.गुरूवारी पेन्शन घेण्यासाठी सदर महिला श्रीरामपूरला आलेली होती.

शुक्रवारी सकाळी १० वाजता परत केडगावला जाण्यासाठी सदर महिला दत्तनगर येथून श्रीरामपूर बस स्टँडवर शक्रवारी सकाळी १०.३० वाजता आली असता, पुणे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना मोठी गर्दी झाली होती.तेव्हा त्यांनी त्यांच्याजवळील पर्सची चैन उघडी दिसल्याने पर्समध्ये ठेवेलेले पैसे तसेच कागदपत्रांची खात्री केली असता, पर्समध्ये ठेवलेले ३० हजार रूपये दिसले नाही.

तसेच आतमध्ये ठेवलेले बडोदा बँकेचे पासबुक, आधार कार्ड, रेशनकार्डही दिसले नाही.त्यामुळे अज्ञात चोरट्याने पर्सची चैन उघडून चोरी केल्याचे दिसून आले. याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत शहर पोलीस पुढील तपास करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe