अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Ahmednagar crime :- शेतातील बांधावरील गवत पेटविण्यास विरोध केला. या कारणावरून एक महिला व त्यांच्या मुलांवर आरोपींनी लोखंडी रॉड व कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
ही घटना दिनांक ५ मार्च रोजी राहुरी तालूक्यातील सोनगाव सात्रळ येथे घडली. सौ. सविता राजेंद्र धनवटे वय ४० वर्षे राहणार सोनगाव सात्रळ, ता. राहुरी. यांनी काल दिनांक २४ मार्च रोजी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे
कि, दिनांक पाच मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान सौ. सविता धनवटे या त्यांच्या घरासमोरील पटांगणात उभ्या होत्या. त्यावेळी त्या ठिकाणी आरोपी आले.
आणि म्हणाले कि, तू दुपारी शेतातील बांधावरील गवत जाळण्यास विरोध का केला. असे म्हणून त्यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून वाईट वाईट शिवीगाळ केली.
तसेच लोखंडी राॅड व कुऱ्हाडीने सौ. सविता धनवटे व त्यांच्या मुलांवर वार करून गंभीर जखमी केले. नंतर त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत सौ. सविता धनवटे व त्यांची मुले गंभीर जखमी झाली होती.
त्यांनी काही दिवस रुग्णालयात उपचार घेतले. काल त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात हजर होऊन गुन्हा नोंदवीला आहे. सौ. सविता राजेंद्र धनवटे
यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी मयुर लक्ष्मण गोरे, लक्ष्मण माधव गोरे, अपेक्षा लक्ष्मण गोरे, संगिता लक्ष्मण गोरे राहणार सात्रळ सोनगाव.
अलका बापूसाहेब वराळे, राहणार राहुरी. तसेच संगिता रवींद्र खुरूद, राहणार देवळाली प्रवरा, ता. राहुरी. या सहा जणांवर गंभीर मारहाण केल्याचा व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोमनाथ जायभाय हे करीत आहेत.