Ahmednagar Crime News : अश्लील व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने महिलेची आत्महत्या

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Crime News : अश्लील व्हिडीओ रेकोर्डिंग प्रसारित करण्याची धमकी प्रियकराने दिल्याने शहरातील एका महिलेने रविवारी (दि. १६) सायंकाळी सहा वाजण्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार समजल्याने सदर महिलेच्या मुलीने अगोदरच्या दिवशी फिनेल नावाचे विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रेम संबधातून एका महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पतीशी फारकत झालेल्या एका महिलेचे शहरातील एका व्यक्तीशी प्रेम संबंध जुळल्याने तो तिच्या घरी येत जात होता. मात्र, त्या व्यक्तीचे आणखी एका महिलेशी प्रेमसंबंध होते. आत्महत्या केलेल्या महिलेच्या घरी येता जाताना त्याने तिचे अंघोळ करताना व्हिडीओ रेकॉर्डिंग केले व प्रेमसंबंध असणाऱ्या दुसऱ्या महिलेने हे व्हिडीओ तिच्या भावाच्या मोबाईलवर पाठवले व त्याला घरी बोलावले;

परंतु घरी जाण्यास त्याने नकार दिल्याने मी तुझ्या बहिणीस बदनाम करील, तिचे जगणे मुश्किल करील व हे व्हिडिओ सर्वांना दाखवील, अशी धमकी दिली. त्यानंतर भावाने बहिणीला याची विचारणा केली असता, मी घरात अंघोळ करत असताना व्हिडीओ काढल्याची माहिती दिली.

याची माहिती मयताच्या मुलीला समजल्याने तिने रागाच्या भरात फिनेल घेतले होते. न ग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने या त्रासाला वैतागून या महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मयत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe