अल्पवयीन मुलींचा पाठलाग करुन तरुणाकडून विनयभंग

Sushant Kulkarni
Published:

१० जानेवारी २०२५ संगमनेर : खासगी शिकवणी संपवून बसस्थानकाकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलींची छेड काढत लज्जास्पद वर्तन केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी संगमनेरात घडला.याप्रकरणी शहर पोलिसांनी आदेश राजेंद्र वाडेकर याच्यावर विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

त्यास न्यायालयात हजर केले असता,एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून,पीडित अल्पवयीन मुलगी गावाहून संगमनेरला एसटी बसने आपल्या मैत्रिणीसह ये जा करते.सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास खासगी शिकवणी संपवून मैत्रिणींसह गावाकडे जाण्यासाठी एसटी बसस्थानकावर जात असताना चहाच्या दुकानासमोर त्या उभ्या होत्या.

त्यावेळी चहाच्या दुकानातील एक इसम त्यांच्याकडे पाहून हाताने फोन करण्याचा इशारा करीत होता.त्यामुळे घाबरलेल्या मैत्रिणी तेथून बाजूला जात असताना त्याने पाठीमागून येऊन फिर्यादी मुलीचा हात पकडला आणि लज्जा उत्पन्न होईल,असे वर्तन केले.

पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन तरुणाला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आदेश राजेंद्र वाडेकर (रा. चास पिंपळदरी, ता. अकोले) याच्यावर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक फडोळ करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe