Parner News : पत्नी व मुलाला विषारी औषध पाजून तरुणाची आत्महत्या

Ahmednagarlive24 office
Published:
Parner News

पत्नीशी झालेल्या किरकोळ भांडणातून तरुणाने पत्नी व पोटच्या ६ वर्षीय मुलाला विषारी औषध पाजत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना दि. ५ जानेवारी २०२४ रोजी पारनेर तालुक्यातील वारणवाडी जवळ घडली. घटनेत गजानन भाऊ रोकडे ङवय ३५), पौर्णिमा गजानन रोकडे (वय ३४), दुर्वेश गजानन रोकडे (वय ६) वर्षे, सर्व रा. उदापूर, ता. जुन्नर, जि. पुणे यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेतून ९ वर्षांची चैत्राली गजानन रोकडे ही बचावली असून, तिच्यावर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गजानन भगवान रोकडे व त्यांची पत्नी पौर्णिमा, असे दोघे रांजणगाव गणपती, ता. शिरुर येथे राहत होते. रांजणगाव गणपती येथील पतसंस्थेत ते दोघेही नोकरीला होते.

दि. ५ जानेवारी रोजी गजानन भगवान रोकडे हे पत्नी पौर्णिमा, मुलगी चैत्राली व मुलगा दुर्वेश, उदापूर येथून श्रीरामपूरकडे जाण्यासाठी मोटारसायकलवरून निघाले असता, रस्त्यातच पती- पत्नीचे भांडण झाले, त्यामुळे गजानन याने त्याची पत्नी पौर्णिमा, मुलगा दुर्वेश व मुलगी चैत्राली यांना त्याच्याकडील ड्रममधील विषारी औषध बळजबरीने पाजले,

त्यानंतर मुलगा दुर्वेश यास पाण्याच्या डबक्यामध्ये फेकून दिले तर पत्नी पौर्णिमा हीस साडीने गळफास देऊन ठार मारले व स्वतः देखील साडीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्य केली.

या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय ठाकूर यांच्यासह सहाय्यक फौजदार संदीप गायकवाड करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe