माझे व तुझ्या बहिणिचे प्रेमसंबंध आहेत,आमच्या मध्ये का येते ? असे म्हणत तरुणाने भर रस्त्यात…

Sushant Kulkarni
Published:

३ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : तालुक्यातील एका विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिची छेड काढणाऱ्या तरुणाविरोधात तालुका पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून तीन दिवस झाले तरी आरोपी मोकाट आहे. प्रकाश बाळासाहेब बारसे (वय २०, रा. कारेगाव) असे आरोपीचे नाव आहे.

पिडीत मुलगी २८ जानेवारी रोजी सकाळी आपल्या भावासमवेत शाळेत जात होती. यावेळी प्रकाश हा आपल्या काही मित्रांसमवेत तेथे आला.एका दुकानासमोर तिला अडवून माझे व तुझ्या बहिनीचे प्रेमसंबंध आहेत.तू मध्ये का येतेस असे म्हणून तिच्या गालावरून हात फिरविला व तिला लज्जा उत्पन्न होईल,असे वर्तन केले.

या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने सर्व प्रकार वडिलांना सांगितला.त्यानंतर वडिलांसमवेत तालुका पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद नोंदविली.दरम्यान याच आरोपीने २६ जानेवारी रोजी देखील खडे मारून तिला त्रास दिला होता.

त्यावेळी गावातील काही व्यक्तींनी त्याला समज देऊन सोडले होते.त्यानंतरही त्याची छेड काढण्यापर्यंत मजल गेली.याप्रकरणी तालुका पोलिस अधिक तपास करीत असले तरी अद्याप आरोपी मिळून न आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe