अहिल्यानगर : राहत्या घराच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेत एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ही घटना ४ मार्च रोजी सायंकाळी शहरातील सिद्धार्थनगर येथे घडली. बंडू मधुकर ठोकळ (रा. सिद्धार्थनगर, अ.नगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
ठोकळ यांच्या कुटुंबातील मुलीचे ४ मार्च रोजी लग्र होते. त्यामुळे सर्व कुटुंबीय विवाहस्थळी गेलेले होते. मयत बंडू ठोकळ हे सायंकाळी ६ च्या सुमारास कुटुंबातील इतर सदस्यांना सांगून घरी आले.
