पिक विमा योजनेबाबत झाला मोठा निर्णय ! आता शेतकऱ्यांना किमान ‘इतकी’ नुकसान भरपाई मिळणार, कृषिमंत्री मुंडे यांची मोठी घोषणा

Tejas B Shelar
Published:

Pik Vima Yojana Maharashtra : पावसाळी अधिवेशन 2023 राज्यातील शेतकऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास राहिले आहे. या अधिवेशनात राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी देखील विविध निर्णय पारित करण्यात आले आहेत. दरम्यान आज या पावसाळी अधिवेशनाचा सेंड ऑफ होता.

अर्थातच आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. हा शेवटचा दिवस मात्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष खास राहिला आहे. कारण की, आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूपच फायद्याचा ठरणार आहे.

आज विधिमंडळात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नवोदित कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा पिक विमा योजनेबाबत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाने एक रुपयात पीक विमा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता.

दरम्यान आता या एक रुपयात पिक विमा योजनेबाबत या पावसाळी अधिवेशनात शिंदे सरकारने मोठी घोषणा केली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधिमंडळात शेतकऱ्यांना आता पिक विमा योजनेअंतर्गत कमीत कमी एक हजार रुपये एवढी नुकसान भरपाई मिळणार अशी मोठी घोषणा केली आहे.

मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून मिळणारी रक्कम 1,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून देण्यात येईल आणि शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये एवढी नुकसान भरपाई मिळेल.

नुकसानीची माहिती देण्यासाठी टाईम वाढवून मिळणार
या सोबतच कृषी मंत्री मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास पिक विमा नुकसान भरपाई क्लेम करण्यासाठी शेतकऱ्यांना किमान 96 तासाची मुदत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळवण्यासाठी 72 तासांचा अवधी देण्यात आला आहे. मात्र हा अवधी शेतकऱ्यांसाठी पुरेसा नसून यामध्ये वाढ व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

याच पार्श्वभूमीवर आता राज्य कृषी मंत्री पीक नुकसानीची माहिती देण्यासाठी सध्याचा असलेला 72 तासांचा कालावधी 96 तासांपर्यंत वाढवावा यासाठी केंद्राकडे मागणी करणार आहेत. निश्चितच केंद्राने जर ही मागणी मान्य केली तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe