Ahilyanagar News : 30 जून 2025 पासून सुरू झालेले पावसाळी अधिवेशन आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. उद्या 18 जुलै 2025 रोजी पावसाळी अधिवेशनाची सांगता होणार आहे आणि असे असतानाच आता विधानसभेतील वातावरण प्रचंड तापले आहे. दरम्यान आज विधानसभेत पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी एका नगर-पुणे महामार्गावरील नियमबाह्य टोल वसुलीकडे सरकारचे लक्ष वेधत आक्रमक भूमिका घेतली.
आज 17 जुलै रोजी सुपा टोलनाक्यावर चेतक इंटरप्रायजेस कंपनीकडून सुरू असलेल्या नियमबाह्य टोलवसुलीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला अन यामुळे सभागृहातील वातावरण पूर्णपणे तापले होते.

पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी सभागृहात असा आरोप केला की, केवळ 132 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी सदर कंपनीने आतापर्यंत तब्बल 700 कोटी रुपयांची टोलवसुली केली आहे. यामुळे जनतेची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली असून याप्रकरणी शासनाने लक्ष घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
महामार्गाचे काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे
आ. दाते यांनी टोल वसुलीमध्ये सुरू असणारी गंभीर अनियमितता तसेच आर्थिक अपहार यासोबतच महामार्गाच्या बांधकामावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या महामार्गाच्या निकृष्ट दर्जाबाबत त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणालेत की, रस्त्यावर केवळ पॅचवर्क डांबरीकरण करण्यात आले आहे.
वास्तविक या महामार्गावर 40 मेमी जाडीचे डांगरीकरण करण्यापेक्षा होते सोबतच रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड सुद्धा करणे अपेक्षित होते मात्र प्रत्यक्षात डांबरीकरणाच्या नावाखाली फक्त पॅचवर्क करण्यात आले आहे आणि वृक्षलागवड सुद्धा झालेले नाही. जे की पूर्णपणे नियमबाह्य आहे.
यासोबतच ॲम्ब्युलन्स, क्रेन व आपत्कालीन सेवा पुरवण्याची जबाबदारी संबंधित कंपनीचे असताना सुद्धा ही जबाबदारी कंपनीने पार पाडलेली नाही असाही गंभीर आरोप यावेळी आमदार दाते यांनी केला.
संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
या महामार्गावर अपघात झाल्यास तत्काळ मदत मिळत नाही आणि यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना तसेच नागरिकांना आपला जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे.
यामुळे सभागृहात आमदार दाते यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत आणि या सदर कंपनीसह संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी यावेळी सरकारकडे केली आहे. पुढे बोलताना दाते यांनी ही फक्त आर्थिक नव्हे, तर जनतेच्या सुरक्षेशी संबंधित लूट आहे म्हणून याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आग्रही मागणी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तपशीलवार चौकशी करून जे कोणी दोषी आहेत त्या दोषींना शिक्षा झाली पाहिजे, यासंदर्भात शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अन संबंधितांवर कारवाई करावी असा ठाम इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला आहे.