FD Interest Rates : आजकाल पैशांच्या बचतीसाठी एफडीसाठी हा अत्यंत चांगला पर्याय मानला जातो. जर तुम्हीही तुमचे पैसे एफडी स्कीममध्ये जमा करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे.
इंडसइंड बँक, पंजाब अँड सिंध बँकेने आपल्या एफडीदरात बदल केला आहे. इंडसइंड बँकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे.

केलेल्या या नव्या बदलांनंतर बँक आता सर्वसामान्यांसाठी 3.50% ते 7.85% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.25% ते 8.25% पर्यंत व्याज दर देत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, हे दर 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होतील.
पंजाब अँड सिंध बँकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. नवीन बदलानुसार बँक आता सात दिवस ते दहा वर्षांच्या ठेवींवर 2.8% ते 7.35% पर्यंत व्याज देत आहे.
तर ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर 0.50% अतिरिक्त व्याजाचा लाभ दिला जात आहे. तर सुपर सीनियर सिटिझन च्या श्रेणीत येणाऱ्या ग्राहकांना 333 दिवस, 444 दिवस आणि 555 दिवसांच्या एफडीवर 0.15% अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळत आहे.
IDBI बँकेने आपल्या ग्राहकांसाठी 375 आणि 444 दिवसांची विशेष मुदत ठेव योजना सुरू केली आहे. या योजनेत तुम्ही ३१२ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूक करू शकता. 375 दिवसांच्या मुदत ठेव योजनेचे नाव अमृत महोत्सव आहे.
या योजनेत बँक सर्वसामान्य नागरिकांना ७.१० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याजदर गुंतवणुकीवर देत आहे. त्याच वेळी, 444 दिवसांच्या FD अंतर्गत सर्वसामान्यांना 7.15 टक्के व्याजदर आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.65 टक्के व्याजदर मिळत आहे.
400 दिवसांची विशेष FD
इंडियन बँकेने 400 दिवसांची विशेष मुदत ठेव योजना देखील सुरू केली आहे. इंडियन बँकेच्या या एफडी स्कीममध्ये तुम्ही 10,000 ते 2 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. बँक या विशेष कालावधीच्या एफडीवर सर्वसामान्यांना ७.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याजदर देत आहे. याशिवाय, बँक सुपर ज्येष्ठ नागरिकांना 8.00 टक्के दराने व्याज देत आहे.













