Maruti Suzuki Jimny : मारुतीने यावर्षी सुरवातीलाच ऑटो एक्स्पो 2023 मध्ये आपल्या सुझुकी जिम्नी चे अनावरण केले होते. यासोबतच, कंपनीने आपल्या नवीन जनरेशन मारुती सुझुकी फ्रॉन्क्सचे देखील अनावरण केले होते . ती आता भारतीय बाजारात अतिशय लोकप्रिय एसयूव्ही बनली आहे. मारुती सुझुकी जिम्नी ही मारुतीची स्वस्त आणि उत्कृष्ट ऑफ रोडर कार आहे.
Maruti jimny Navaratri Discount
मारुती सुझुकी जिम्नी डीलरशिप आपल्या झेटा व्हेरियंटवर 50,000 रुपयांची सूट देत आहेत. याशिवाय कंपनी एक्सचेंज बोनस आणि लॉयल्टी बोनसच्या रूपात 50,000 रुपयांची अतिरिक्त ऑफर देखील देत आहे. ही ऑफर फक्त या महिन्यासाठी वैध आहे आणि याव्यतिरिक्त, आपण मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह Jimny च्या झेटा व्हेरिएंटवरच ही ऑफर घेऊ शकता.
Maruti Jimny variant ची किंमत
मारुती सुझुकी जिम्नी ही झेटा आणि टॉप-व्हेरिएंट अल्फा या दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. भारतीय बाजारात जिम्नी ची किंमत 12.74 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 15.025 लाख रुपये पर्यंत जाते.
Maruti Jimny कलर्स
जिम्नी मध्ये दोन ड्युअल टोन आणि पाच मोनोटोन कलर ऑप्शन देण्यात आले आहेत. यात कायनेटिक पिवळ्या रंगासह Bluish Black Roof, Sizzling Red रंगासह Bluish Black Roof आहे. यामध्ये Sizzling Red, Granite Grey, Nexa Blue, Bluish Black आणि पर्ल आर्क्टिक व्हाईट चा समावेश आहे. यात 208 लिटर बूट स्पेस मिळतो.
Maruti Jimny इंजिन
यात 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन चा वापर करण्यात आला आहे जो 105 बीएचपी पॉवर आणि 134 एनएम टॉर्क जनरेट करतो. यात पाच स्पीड मॅन्युअल आणि चार स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स चा पर्याय देण्यात आला आहे. चांगल्या ऑफ-रोडिंगसाठी याला 4 डब्ल्यूडी लो आणि 4 डब्ल्यूडी हाय देण्यात आले आहे. शिवाय, महिंद्रा थारपेक्षा ही हलकी आहे, त्यामुळे खराब रस्ते आणि लहान रस्त्यांवर ती सहज चालू शकते.
Maruti Jimny फीचर्स
फीचर्समध्ये यात 9 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटोसह अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. यात उत्कृष्ट क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक वेदर कंट्रोल,हाइट एडजेस्टेबल ड्राइवर सीट, प्रीमियम म्युझिक सिस्टीम आणि लेदर सीट यांचा समावेश आहे.
Maruti Jimny Safety फीचर्स
सेफ्टी फीचर्समध्ये सहा एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, हिल होल असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग सेन्सरसह कॅमेरा आणि ईबीडीसह एबीएस देण्यात आले आहे.
Maruti Jimny ची स्पर्धा
भारतीय बाजारपेठेत ही कार केवळ दोन वाहनांशी स्पर्धा करते. महिंद्रा थार आणि Force Gurkha या दोन कारला ही कार टक्कर देते.