सर्वसामान्य नागरिकांना कल्याणमध्ये 10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणार घर ! म्हाडाच्या लॉटरीमध्ये सर्वाधिक घरे कल्याणमध्येच

तुम्हीही म्हाडाच्या घरांची वाट पाहत आहात का ? मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे म्हाडाच्या कोकण मंडळाकडून हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.

Published on -

Mhada News : म्हाडाच्या कोकण मंडळांने सर्वसामान्य नागरिकांसाठी पाच लाखाहून अधिक घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. कोकण मंडळाकडून ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई परिसरातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. यासाठी 15 जुलैपासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. कोकण मंडळाने या संबंधित भागातील 5,362 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे.

महत्त्वाची बाब अशी की, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या या लॉटरीमध्ये सर्वाधिक घरे कल्याण मध्येच आहेत. अशा परिस्थितीत आता आपण म्हाडाच्या कोकण मंडळाच्या या लॉटरीमध्ये कल्याण मधील कोणत्या भागातील घरांचा समावेश आहे आणि त्या घरांच्या किमती किती आहेत याची डिटेल माहिती आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कल्याण मधील या घरांचा लॉटरीमध्ये समावेश 

तिसगाव : कल्याण मधील तिसगाव येथील गौरी विनायक बिल्डर्सच्या अत्यल्प उत्पन्न गटातील सात घरांचा या लॉटरीमध्ये समावेश आहे. या घरांच्या किमती 9 लाख 55 हजार 800 रुपयांपासून सुरू होतात आणि अकरा लाख 32 हजार 100 रुपयांपर्यंत जातात.

सिझन सहारा, आडीवली, पिसवली : येथील 37 घरांचा लॉटरीमध्ये समावेश आहे. हे घरं अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. ह्या घरांची किंमत 18,90,600 ते 25,75,100 अशी आहे. 

अभिदर्शन कॉर्पोरेशन, एल एल पी , टिटवाळा : या भागातील एकूण 58 घरांचा समावेश या लॉटरीमध्ये करण्यात आला आहे. ही घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत. या घरांची किंमत 19,60,900 ते 19,95,400 दरम्यान आहे. 

शिरढोण : या भागातील 525 घरांचा या लॉटरीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ही सर्व घरे अल्प उत्पन्न गटातील आहेत. या घरांची किंमत 35 लाख 66 हजार 689 रुपये इतकी आहे.

धारवानी प्रॉपर्टी : या भागातील सहा घरांचा या लॉटरीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ही घरे सुद्धा अल्प उत्पन्न गटातील आहेत. या घरांची किंमत 22 लाख 41 हजार रुपये इतकी आहे. 

होराईझन प्रोजेक्ट प्रा. लिमिटेड, उमरसर सांडप, ठाणे : या परिसरातील रुणवाल डेव्हलपर्स कडील एकूण 571 घरे लॉटरी मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. यातील 432 घरे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत आणि उर्वरित घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत. किमती बाबत बोलायचं झालं तर अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती 19,03,300 ते 19,13,800 दरम्यान निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच अत्यल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती 13 लाख 40 हजार पाचशे रुपये इतकी फिक्स करण्यात आली आहे.

मॅक्रो टेक डेव्हलपर्स, घारीवली : या भागातील तब्बल 2429 घरांचा या लॉटरीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ही घरे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत आणि या घरांची किंमत 21,37,770 ते 21,98,200 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!