सापांचा धोका वाटतो का ? मग घरात ‘या’ लिक्विडचा वापर करा, सापांचा धोका कायमचा मिटणार, कस तयार करणार लिक्विड?

तुम्हालाही सापांची भीती वाटते का? मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. कारण की आज आपण अशा एका खास लिक्विडची माहिती जाणून घेणार आहोत ज्याच्या फवारणीमुळे साप नेहमीच घरापासून दूर राहतात.

Published on -

Snake Viral News : तुम्हालाही सापांचा प्रचंड धोका वाटतो का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भारतात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतात. एका अनाधिकृत आकडेवारीनुसार देशात जवळपास 80 ते 90 हजार लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो.

खरे पाहता भारतात सापांच्या शेकडो प्रजाती आहेत. मात्र यातील काही बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती विषारी आहेत. किंग कोब्रा, रसल वायपर, कॉमन करेत अशा काही प्रमुख जाती आहेत ज्या की प्रचंड विषारी असतात आणि या जाती भारतात मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

देशात आढळणाऱ्या बहुतांशी सापांच्या जाती बिनविषारी आहेत मात्र तरीही देशात सर्पदंशाने मरणाऱ्यांची संख्या अधिक आहे आणि यामुळे आपण सर्वजण सापांना खूपच घाबरतो. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांचा धोका अधिक असतो आणि या दिवसात सगळ्यांनीच विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

जे लोक शेतात राहतात किंवा जंगलाच्या परिसरात राहतात त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, जर तुम्हालाही सापांचा धोका वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका लिक्विडची माहिती सांगणार आहोत ज्याच्या वापरामुळे सापांचा धोका कमी होऊ शकतो.

या लिक्विडचा वापर केल्यास साप घरांपासून लांब राहणार 

मीडिया रिपोर्ट नुसार, जर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घराच्या आजूबाजूला शेवग्याच्या सालीपासून तयार करण्यात आलेले लिक्विड फवारले तर साप घराच्या आजूबाजूला सुद्धा फिरकत नाहीत.

शेवग्याच्या झाडाच्या सालीपासून तयार करण्यात आलेले हे खास प्रकारचं लिक्विड अगदीच घरच्या घरी तयार करता येत. जर तुम्हाला हे लिक्विड तयार करायचे असेल तर सर्व प्रथम शेवग्याच्या झाडाची साल काढून आणा मग ती बारीक कुटून घ्या.

त्यानंतर बारीक कुटलेली साल पाण्यात विरघळून घ्या. मग जादुई मिश्रण तयार होणार आहे. शेवग्याच्या सालीपासून तयार करण्यात आलेले हे मिश्रण मग तुम्ही घराच्या खिडक्या, दरवाजे, आणि भितींच्या कोपऱ्यांमध्ये फवारू शकता.

असा दावा केला जातो की या लिक्विडच्या तीव्र वासामुळे साप घराच्या आजूबाजूला सुद्धा येत नाहीत. तसेच घरात कुठेही साप लपून बसला असेल तर तो देखील बाहेर निघून जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!