Trains for Pandharpur : आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने नागपूर-मिरज, नागपूर-पंढरपूर व अमरावती-पंढररपूर दरम्यान २५ ते २८ जून रोजी दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाडीच्या अप व डाउन अशा सहा फेऱ्या होणार असून त्या अकोला स्थानकावरून जाणार असल्याने भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. याशिवाय खामगाव येथूनही एक विशेष गाडी पंढरपूरला सोडली जाणार आहे.
मध्य रेल्वे नागपूर-मिरज, नागपूर-पंढरपूर, नवीन अमरावती- पंढरपूर, खामगाव- पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, मिरज-कुर्डुवाडी पंढरपूर आषाढी एकादशी विशेष गाड्या चालवणार असून ९ विशेष गाड्यांच्या ७६ फेऱ्या होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
■ भुसावळ-पंढरपूर दरम्यान विशेष गाडीच्या २ फेऱ्या होतील. ही गाडी २८ रोजी भुसावळहून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूरला पोहचेल. पंढरपूर येथून २९ जून रोजी रात्री १०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता भुसावळला पोहचेल.
■ नागपूर-मिरज दरम्यान विशेष गाडी ४ फेऱ्या मारणार असून ही गाडी २५ जून आणि २८ जून रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूरहून सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरजला पोहचेल. मिरज येथून २६ जून आणि २९ जून रोजी दुपारी १२.५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता नागपूरला पोहचेल.
■ नागपूर-पंढरपूर दरम्यान विशेष गाडीच्या ४ फेऱ्या होणार असून ही गाडी नागपूरहून २६ व २९ जून रोजी सकाळी ८.५० वाजता सुटेल, व दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पंढरपूरला पोहचेल. तर २७८ ३० जून रोजी पंढरपूरहून सायंकाळी ५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता नागपूरला पोहचेल.
■ नवीन अमरावती-पंढरपूर दरम्यान विशेष गाडीच्या ४ फेऱ्या होणार असून विशेष नवीन अमरावती येथून २५ व २८ जून रोजी दुपारी २.४० वाजता ही गाडी सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता पंढरपूरला पोहचेल. तर पंढरपूर येथून २६ व २९ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४० वाजता नवीन अमरावती येथे पोहचेल.
■ खामगाव-पंढरपूर दरम्यान विशेष गाडीच्या ४ फेऱ्या होणार असून खामगावहून २६ जून आणि २९ जून रोजी सकाळी ११.३० वाजता सुटणारी गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूरला पोहचेल. तर पंढरपूरहून २७८ ३० जून रोजी पहाटे ५ वाजता सुटणार असून दिवशी सायंकाळी ७.३० वाजता खामगावला पोहचेल.