Top MBA Branches : ग्रॅज्युएशन नंतर एमबीए करण्याच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. कारण आज आपण एमबीएच्या प्रमुख ब्रांचेसची माहिती पाहणार आहोत. एमबीएच्या कोणत्या टॉप 5 ब्रांच आहेत ज्या विद्यार्थ्यांचे करिअर सेट करू शकतात याबाबत आता आपण डिटेल माहिती पाहूयात. आज आम्ही तुम्हाला ज्या ब्रांचेस बाबत सांगणार आहोत या ब्रांचेस मधून जर तुम्ही एमबीए कम्प्लीट केलं तर नक्कीच तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी लागणार आहे.
‘या’ आहेत एमबीएच्या टॉप 5 ब्रांचेस
मार्केटिंग : जर तुम्ही एमबीए मार्केटिंग केले तर तुम्हाला ब्रँड व्यवस्थापन, डिजिटल मार्केटींग, विक्री, बाजार संशोधन मध्ये करिअर घडवता येणार आहे. हा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला दहा ते तीस लाख रुपये पॅकेजची नोकरी लागू शकते. युनिलिव्हर, पी अँड जी, Amazon मेझॉन, फ्लिपकार्ट अशा कंपन्यांमध्ये या उमेदवारांना सहज नोकरी मिळू शकते.

ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट : तुम्हाला एमबीए करायची असेल तर तुम्ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या ब्रांचची निवड करायला काही हरकत नाही. या ब्रांच मधून तुम्ही डिग्री कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंट, कर्मचारी प्रशिक्षण, ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट मध्ये चांगले करिअर घडवता येणार आहे.
ही डिग्री कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला आठ ते 22 लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी लागू शकते. डेलोइट, हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर टीसीएस, इन्फोसिससारख्या कंपन्यांमध्ये तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा मिळू शकते.
डिजिटल मार्केटिंग : डिजिटल मार्केटिंग सुद्धा तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय राहणार आहे. डिजिटल मार्केटिंग या ब्रांच मध्ये एमबीए केल्यास तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. डिजिटल मार्केटिंग मध्ये एमबीए केल्यास तुम्ही एसईओ/एसईएम एक्सपर्ट, सोशल मीडिया मैनेजर, कंटेंट मार्केटिंगमध्ये तुमचे करियर सेट करू शकता.
ऑपरेशन्स मॅनेजमेंट : एमबीएचा हा सुद्धा एक लोकप्रिय प्रकार आहे. ऑपरेशन्स मॅनेजमेंट मध्ये एमबीएची डिग्री कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला सप्लाय चेन मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स आणि प्रोडक्शन मॅनेजमेंट मध्ये करिअर घडवता येणार आहे. सरासरी दहा ते पंचवीस लाख रुपये पॅकेजची नोकरी लागू शकते.
फायनान्स : एमबीए इन फायनान्स हा सर्वाधिक लोकप्रिय अभ्यासक्रम आहे असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. एमबीए करणारे बहुतांशी विद्यार्थी फायनान्सला जाण्याच्या तयारीत असतात. फायनान्स मधून एमबीए केल्यानंतर तुम्हाला इन्वेस्टमेंट बैंकिंग, कॉर्पोरेट फाइनेंस, वेल्थ मैनेजमेंट, फिनटेकमध्ये करियर घडवता येणार आहे.