तुमच्याही हातात पैसा टिकत नाही, मग घरात ‘या’ 2 ठिकाणी मोराची मूर्ती ठेवा, आयुष्यात कधीच पैशांची कमतरता भासणार नाही

तुम्हालाही नेहमीच पैशांची अडचण भासते का, कितीही पैसा आला तरी हातात पैसा टिकत नाही का? मग आजचा हा लेख खास तुमच्या कामाचा आहे. आज आपण पैसा टिकत नसल्यास काय केले जाऊ शकते याची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Vastu Tips : अलीकडे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि यामुळे थोडा पण अनावश्यक खर्च झाला की संपूर्ण महिन्याचे बजेट बिघडते. आपल्यापैकी अनेकांना असा अनुभव आला असेल. अनेकजण महिन्याकाठी हातात भरपूर पैसा येतो पण पैसा टिकत नाही अशी तक्रार करतात.

लाखो रुपयांची नोकरी करणाऱ्या लोकांना सुद्धा हीच समस्या भेडसावते. दरम्यान जर तुमची ही अशीच समस्या असेल, तुमच्याही हातात पैसा टिकत नसेल तर आजची ही बातमी तुमच्या विशेष कामाची राहणार आहे.

आज आपण हातात पैसा टिकत नाही अशी तक्रार करणाऱ्या लोकांसाठी एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत. वास्तुशास्त्रात घरात पैसा टिकत नसेल तर काय केले जाऊ शकते याबाबत स्पष्ट उल्लेख आहे आणि आज आपण वास्तुशास्त्रात सांगितलेला हाच रामबाण उपाय जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्र काय सांगते?

वास्तुशास्त्रात सांगितलेल्या उपायानुसार जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल तर तुम्ही चांदीचा मोर तुमच्या घरात ठेवला पाहिजे. मात्र चांदीचा मोर घरात योग्य ठिकाणी ठेवला तरच तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे. मोर हे माता लक्ष्मीचे वाहन आहे आणि यामुळे मोराची प्रतिमा जर तुम्ही चांदीमध्ये बनवली आणि ती घरात ठेवली तर माता लक्ष्मी तुमच्यावर विशेष कृपा करणार आहे.

चांदीचा मोर घरात ठेवल्यानंतर माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि यामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी सुद्धा कायमच्या दूर होऊ शकतात. मोर हे माता लक्ष्मीचे वाहन आहे आणि यामुळे चांदीचा मोर जर घरात ठेवला तर यामुळे सौख्याची आणि सुख समृद्धीची प्राप्ती होते. यामुळे धनप्राप्ती होण्याची शक्यता बळावते. 

चांदीचा मोर कुठे ठेवला पाहिजे?

तुम्हालाही तुमच्या घरात चांदीचा मोर ठेवायचा असेल तर तो कुठेही ठेवून भागणार नाही, चांदीचा मोर हा दोन महत्त्वाच्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे. वास्तुशास्त्र असे सांगते की चांदीचा मोर हा तिजोरीत ठेवल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते.

तिजोरी मध्ये जर चांदीचा मोर ठेवला गेला तर तुमचा अनावश्यक खर्च बऱ्यापैकी कमी होतो आणि पैशांची बचत वाढते. चांदीचा मोर जर तिजोरी मध्ये ठेवायचा असेल तर तुम्ही हे काम शुक्रवारी करायला हवे. याशिवाय तुम्ही तुमच्या घरातील देव्हाऱ्यात देखील चांदीचा मोर ठेवू शकता.

देव्हाऱ्यात किंवा पूजा घरात चांदीचा मोर हा माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ ठेवा. देव्हाऱ्यात चांदीचा मोर ठेवल्यास तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि आनंदाचे वातावरण राहणार आहे. मोर ईशान्य किंवा दक्षिण पूर्व कोपऱ्यातच ठेवला पाहिजे असे शास्त्रात सांगितले गेले आहे.

तसेच मोर ठेवल्यानंतर दररोज ती जागा स्वच्छ करणे अपेक्षित आहे. ती जागाच उच्च करून मोर ठेवलेल्या ठिकाणी धूप सुद्धा दाखवली पाहिजे. मात्र चांदीचा मोर बनवताना तो अधिकाधिक आकर्षक कसा होईल याचा प्रयत्न करा आणि मोर घरात ठेवताना मनात शुभ संकल्प हवा. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!