मोठी बातमी ! डॉ. सुजय विखे यांना तिकीट मिळताच अजित दादांना धक्का, निलेश लंके यांच्या घरवापसीच ठरलं ; आज शरद पवार गटात प्रवेश करणार

Tejas B Shelar
Published:
Aamdar Nilesh Lanke News

Aamdar Nilesh Lanke News : लोकसभा निवडणुकांसाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी आहे. सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जूनला संपणार आहे.

तत्पूर्वी निवडणूक आयोग 18 व्या लोकसभेसाठी निवडणुका घेणार आहेत. यामुळे सध्या संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्ष आगामी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला तिकीट दिले पाहिजे यासाठी मंथन करत असून आगामी निवडणुकीसाठी उमेदवार फायनल करून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे.

भारतीय जनता पक्षाने काल आपल्या अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी देखील जाहीर केली आहे. दरम्यान भाजपाची दुसरी यादी जाहीर होताच अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे.

खरेतर, भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे देखील नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुजय विखे पाटील यांचे तिकीट कापले जाणार असे म्हटले जात होते.

मात्र भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने सुजय विखे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. एकीकडे महायुतीमधून नगर दक्षिणच्या जागेवर भाजपाचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.

तर, दुसरीकडे महायुतीमध्ये समाविष्ट असलेले अजितदादा यांच्या गटातील आमदार निलेश लंके यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आज अर्थातच 14 मार्च रोजी निलेश लंके हे अजितदादा यांच्या गटातून शरद चंद्र पवार यांच्या गटात समाविष्ट होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज गुरुवार 14 मार्च 2024 रोजी निलेश लंके शरद पवार यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार आहेत. लंके यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. परंतु लंके यांच्याकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मात्र अधिकृतपणे पक्षप्रवेश झाला की यावर लंके आपली भूमिका मांडणार असल्याचे बोलले जात आहे. निलेश लंके यांच्या हंगा गावात आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास कार्यकर्ते जमणार आहेत आणि मग कार्यकर्ते पुण्याकडे रवाना होतील.

त्यानंतर मग दुपारी पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत आमदार निलेश लंके यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून लंके यांच्या घरवापसीच्या चर्चा आहेत. निलेश लंके यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवायची आहे.

नगर दक्षिण मधून ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. परंतु महायुती मधून लंके यांना तिकीट मिळणे जवळपास अशक्य होते. त्यामुळे ते लवकरच शरद पवार यांच्यासोबत जातील अशी चर्चा होत्या.

11 मार्चला तर त्यांच्या पक्ष प्रवेशाचे ठरल होतं. मात्र, नगर दक्षिणमधून महायुतीकडून कोणाला तिकीट मिळणार ? हे स्पष्ट झालेले नव्हते. यामुळे त्यावेळी घर वापसीच्या निव्वळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण लंके यांनी दिले होते.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रीमो पवार यांनी तर या बातमीत तथ्य नसल्याचे म्हटले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी लंके यांनी राजकारणात काहीही होऊ शकत असे म्हणत पक्षप्रवेशाच्या चर्चा जिवंत ठेवल्या होत्या. यामुळे निलेश लंके यांच्या या भूमिकेनंतर अनेकांनी जेव्हा नगर दक्षिणचा महायुतीचा उमेदवार जाहीर होईल तेव्हा निलेश लंके शरद पवार यांच्या गटात जातील असा अंदाज बांधला होता.

विशेष म्हणजे राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चा आता खऱ्या ठरल्या असून लंके हे आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृतरित्या समाविष्ट होतील अशी खात्रीलायक बातमी समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe