Ahmednagar Loksabha : ज्यांनी अजित पवारांना फसवलं ते उद्या जनतेचीही साथ सोडतील ! जिल्ह्यासाठी केलेलं एक काम दाखवा…

Ahmednagar Loksabha : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे. नगर दक्षिण मध्य तर रोजच काही ना काही नवीन घडामोडी घडतं आहेत. येथून महाविकास आघाडीचे निलेश लंके आणि महायुतीचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यात लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तथा महायुतीने जोरदार प्रचाराला देखील सुरुवात केली आहे.

दरम्यान, महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा जिल्हा कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला आहे. या मेळाव्याला अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या मेळाव्यात राज्याचे महसूल मंत्री तथा नगर दक्षिणचे विद्यमान खासदार आणि आगामी लोकसभेचे उमेदवार सुजय विखे पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्याचे महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

याप्रसंगी बोलताना विखे पाटील यांनी सुपा एमआयडीसी मधील गुंडगिरीचा प्रश्न पुन्हा छेडला आहे. ते म्हणालेत की, नगर जिल्ह्यातील तीन एमआयडीसींसाठी मी सतराशे एकर जागा विनामूल्य उपलब्ध करून दिलेली आहे.

आता उद्योजक कारखानदारांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी सुपा एमआयडीसीमधील त्यांची गुंडगिरी संपवायची आहे. एकंदरीत विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या त्यांच्यावर सुपा एमआयडीसीत गुंडगिरी करत असल्याचा आरोप केला आहे.

तसेच सुपा एमआयडीसी मधील त्यांची गुंडगिरी संपवण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर विखे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले असून यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे.

ज्यांनी अजित पवारांना फसवले ते जनतेलाही फसवणारच

राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश लंके यांना टार्गेट करत ज्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडली, त्यांना फसवले, उद्या ते जनतेचीही साथ सोडतील अशी टीका लंके यांच्यावर केली आहे. तसेच निलेश लंके यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी केलेले एखादे तरी मोठे काम दाखवा मगच एमआयडीसी आणण्याच्या गप्पा मारा असा घणाघात सुद्धा केला आहे.

विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार : डॉ. सुजय विखे पाटील

महायुतीचे नगर दक्षिणचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) ताकद माझ्या मागे खंबीरपणे उभी राहिल्यास समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देखील बोलून दाखवला.

तसेच गेल्या पाच दशकांपासून राजकारणात असलेल्या विखे कुटुंबाने आजपर्यंत एकाही व्यक्तीला त्रास दिलेला नाही. याउलट जिल्ह्याच्या राजकारणात वैचारिकता जपत सुसंस्कृतपणा आणला असल्याचे म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe