Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये उधळला जाणार 80 टन गुलाल ! दोन हजार किलो पेढेही तयार, कार्यकर्त्यांची जय्यत तयारी

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe lanke

Ahmednagar Politics : आज बहुप्रतीक्षित दिवस आलेला आहे. अर्थात आज लोकसभेच्या निवडणुकांच्या मतमोजणीचा दिवस आलेला आहे. अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सध्या एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सुरु आहे.

सायंकाळपर्यंत निकालाची चित्रे जवळपास स्पष्ट होतील अशी शक्यता आहे. दरम्यान सायंकालपर्यंत विजयाची गणिते निश्चित झाल्यानंतर गुलालास मोठी मागणी वाढेल. यापार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख गुलाल विक्रेत्यांनी तयारी केली असून जवळपास ८० टन गुलालाचा स्टॉक उपलब्ध केला असल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे सायंकाळनंतर गुलाल नेमका कुणाचा हे देखील स्पष्ट होणार आहे.

दोन हजार किलो पेढे
विजयाचा जल्लोष करण्यासाठी साधारण दोन हजार किलो पेढे तयार करण्यात आल्याची माहिती आहे. निकाल जाहीर होताच कार्यकर्ते जल्लोष करणार असून एकमेकांचे तोंड गोड करण्यासाठी पेढे, मिठाई ते वाटतील. त्यामुळे शहरातील मिठाई विक्रेत्यांनी दोन दिवस आधीपासूनच तयारी केली असून जवळपास दोन हजार किलो पेढे विक्रीसाठी तयार आहेत.

येण्या-जाण्याच्या मार्गावरील वाहतुकीत बदल
मतमोजणी ठिकाणी मतमोजणी अधिकारी, कर्मचारी तसे उमेदवार प्रतिनिधी व निकाल ऐकण्याकरिता मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व नागरीक येणार असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी असणार आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून येण्या-जाण्याच्या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

विजयाची सर्वानाच खात्री
सध्या विजयाची दोन्ही उमेदवारांना खात्री आहे. दोन्ही उमेदवारांचे समर्थक सध्या विजयाचा दावा करत आहेत. त्यामुळे आता विजयी कोण होईल हे सायंकाळी समजलेच.

निकालास आठ तरी वाजतील
लोकसभेचा जो निकाल आहे तो राऊंड नुसार होणार आहे. फेऱ्या अनेक आहेत. नगर शहरासाठी कमीतकमी २१ राउंड आहेत. तर जास्तीत जास्त राउंड २७ आहेत. त्यामुळे जर एका फेरीला सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास साधारण अर्धा तास पकडला तरी परिपूर्ण निकाल यायला साधारण ८ ते ९ तरी वाजतील असा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe