Ahmednagar Politics : निलेश लंकेंचा हस्तक्षेप प्रस्थापितांची डोकेदुखी वाढवणार ! संग्राम जगतापांना धक्का बसणार ? जिल्ह्यातील विधानसभेची समीकरणे बदलणार…

Ahmednagarlive24 office
Updated:
lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेचा निकाल आता वेगवेगळी समीकरणे समोर मांडू पाहत आहे. या निकालाने अहमदनगर मध्ये पवार यांची पॉवर अधोरेखित होणार आहे. तसेच आता आगामी विधानसभेची अनेक गणिते यात बदलताना दिसतील. या विधानसभेच्या अनुशंघाने प्रस्थापितांची डोकेदुखी वाढेल अशीही चर्चा आहे.

पुढील काही महिन्यातच विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी सर्वच राजकीय पक्ष करतील. या निवडणुकीत जनतेचा मूड प्रस्थापितांनाही कळला आहे. त्यामुळे प्रस्थापीत लोकप्रतिनिधींना नव्याने समिकरणे मांडावी लागणार आहेत.

तसेच लंकेंचा हस्तक्षेप विरोधक प्रस्थापितांची डोकेदुखी ठरू शकतो. पारनेर मतदारसंघात सर्व स्थानिक निवडणुकांत लंकेंनी लक्ष घातले. आता ते संपूर्ण अहमदनगर लोकसभेतील स्थानिक निवडणुकांतही हस्तक्षेप करतील अशी चर्चा काही राजकीय व्यक्तींमध्ये रंगली आहे.

दुसरीकडे पारनेरमध्येही गणिते बदलतील ?
नगर लोकसभा निवडणुकीसाठी नीलेश लंके यांनी पत्नी राणी लंके यांचीही तयारी केली होती. ऐनवेळी नीलेश लंके यांनी शरद पवार पक्षात प्रवेश करून रिंगणात उरण्याचा निर्णय घेऊन विजय मिळवला. आता पारनेर विधानसभा मतदारसंघात राणी लंके यांना उतरवण्याची तयारी केली जाऊ शकते.

अशावेळी पक्षांतर्गत नाराजीचाही सामना करावा लागण्याची शक्यताही फेटाळत येत नाही. महिलांसाठी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यात राणी लंके सक्रिय आहेत. याचा फायदा त्यांना आगामी पारनेर विधानसभेत होऊ शकतो असेही म्हटले जात आहे. त्यामुळे तेथील प्रस्थापितांची आता गोची होऊ शकते असा अंदाज आहे.

शहराचा बदलता अंदाज
मागील निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांना अहमदनगर शहर मतदारसंघाने मोठी साथ दिली. मात्र, यावेळी त्यांनी ऐनवेळी मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जाते त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होऊनही त्यांना शहरातून मताधिक्य मिळाले नाही असे म्हणतात.

अहमदनगर मतदारसंघ निवडणुकीत शहर नेहमीच निर्णायक ठरला आहे. मागील निवडणुकीत डॉ. विखे यांना या मतदारसंघाने ५३ हजारांचे लीड दिले होते. त्यामुळे यावेळी विखे काहीसे निर्धास्त होते. परंतु विविध राजकीय गणिताचा अंदाज न आल्याने विखे यांचा शहराचा अंदाज चुकला अशी चर्चा नागरिकांत आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीकडे झालेले हे मतपरिवर्तन प्रस्थापितांसाठी विचार करायला लावणारे असल्याचे बोलले जाते. तसेच लंके आता शहरातीलही राजकारणात हस्तक्षेप करतील अशी चर्चा काही राजकीय व्यक्तींमध्ये रंगली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe