Ahmednagar Politics : अजित पवारांसोबत गेलेले लंके ऐनवेळी माघारी कसे आले? उमेदवारीही कशी मिळवली? पडद्यामागील घडामोडी समोर

Ahmednagarlive24 office
Published:
nilesh lanke

Ahmednagar Politics : अहमदनगरच्या लोकसभा निवडणुकीत खरा रंग भरला तो म्हणजे विखे व लंके यांच्या पॉवरफुल लढतीमुळे. आज या लढतीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान काल अजित पवार यांची नगरमध्ये विखेंसाठी सभा झाली व त्यांनी निलेश लंके यांच्यावर मोठे टीकास्त्र सोडले.

परंतु निलेश लंके हे तर अजित पवारांसोबत त्यांच्या गटात गेले होते. असं असतानाही ते ऐनवेळेला माघारी शरद पवार गटात कसे आले? त्यांना उमेदवारी कशी दिली गेली ? असे प्रश्न काहींना पडलेही असतील. आता याची उत्तरे समोर आली आहेत. स्वतः शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यामागील घडामोडी सांगितल्या.

ते नगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी पाटील म्हणाले, आमचे व लंके यांचे सहा महिन्यांपूर्वीच ठरले होते. त्यापद्धतीने योग्य वेळ येताच लंके यांना आमदारकीचा राजीनामा द्यायला लावून पक्षात प्रवेश दिला गेला व त्या पद्धतीने उमेदवारीही दिली गेली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

काय म्हणाले जयंत पाटील?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत नीलेश लंके हे गेले हे खरे असले तरी ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संपर्कात होतेच. त्यामुळे त्यांना पक्षात परत घेऊन उमेदवारी दिलेली असल्याचे पाटील म्हणाले.

अजित पवार यांनी आपली भूमिका बदलवली, अजित पवार यांनी बंड करून सत्तेत जाणे हे अचानक झालेलं होत. त्यामुळे अनेक आमदारांसमोर मोठा पेच पडला होता. सत्तेमध्ये सामील होण्याच्या पत्रावर आमदारांनी सह्या केल्या असल्याने भूमिका बदलल्यावर आपले आमदारपद जाईल अशी भीती अनेकांना होती.

दरम्यान, या घडामोडी घडल्या त्याकाळात लंके व खासदार अमोल कोल्हे मात्र आमच्या संपर्कात होते. सहा महिन्यांपूर्वीच लंके पवार गटात येणार असल्याचे ठरले होते असे जयंत पाटील यांनी सांगितले.

अजित पवारांसोबत जे गेले त्यांना आमच्याकडे नो एन्ट्री होती. परंतु जे कायम आमच्या संपर्कात राहिले त्यांना आम्ही प्रवेश दिला व त्यात अमोल कोल्हे आणि नीलेश लंके यांचा समावेश होता असे पाटील म्हणाले. निवडणूक जवळ येताच आम्ही लंके यांना राजीनामा द्यायला लावल्याचे देखील वक्तव्य पाटील यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe