Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात दक्षिणेकडे ज्या प्रमाणे विखे-लंके लढत तापली आहे तसेच वातावरण आता उत्तरेतही तापू लागले आहे. महायुतीकडून याठिकाणी खा. सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली आहे.
महायुतीमुळे अनेक नेत्यांची गोची झाली आहे. एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक एकमेकांसाठी आता मतदारांकडे मत मागतायेत. त्यातच आता सदाशिव लोखंडे यांच्या अडचणी काही कमी होताना दिसेनात.

अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांची भेट घेतली असता लहामटे यांनी जर तुम्ही गुंड, खंडणीखोर आणि दादागिरी करणार्यांना सोबत घेऊन त्यांनाच पोसणार असाल तर आम्ही तुमचे काम करावे अशी आपेक्षा ठेवू नका. कारण, या तालुक्यात आम्ही विकासाचे राजकारण केले आहे. भाईगिरीचे नव्हे.. त्यामुळे, तुम्ही निवडून आलात तरी गुंड, खंडणीखोर आणि दादागिरी करणार्यांचे हात बळकट होणार असेल तर आम्हाला विचार करावा लागेल असा इशाराच दिल्याची चर्चा अकोल्यात रंगली होती.
महायुतीमध्ये आता अनेक विरोधक एकत्र दिसले असले तरी डॉ. लहामटे यांच्यासारखे काही आमदार तडतजोड करुन घेण्यास काही तयार नसल्याचे व चुकीला चुक म्हणण्यावर ते ठाम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महायुतीत असल्याने सदाशिव लोखंडे यांना खासदारकीचे तिकिट मिळाल्यानंतर डॉ. लहामटे यांना लोखंडे मान्य आहेत परंतु त्यांच्यासोबत असणारे काही गुन्हेगारी क्षेत्रातील माणसे मंजूर नसल्याचे चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
त्यामुळे तुमच्या प्रत्येक सभा आणि धवपळीत मी युतीचा धर्म निष्ठेने पाळेल. मात्र, तुम्ही जर गुंड, खंडणीखोर आणि दादागिरी करणार्यांचे हात बळकट होणार असेल तर आमच्याकडून कोणतीही आपेक्षा ठेऊ नका असे लहामटे यांनी म्हटले असल्याचे समजते.
पिचड व आ. लहामटे एकाच व्यासपीठावर !
राज्यात शिंदे-फडणविस-पवार यांच्या महायुतीमुळे लोकसभा निवडणुकीत पिचड आणि डॉ. लहामटे हे राजकीय विरोधक एकाच व्यासपिठावर दिसतील. यावर बोलताना डॉ.लहामटे यांनी सांगितले की, पिचड एका कोपर्यात आणि मी दुसर्या कोपर्यात मला त्यांच्याशी काहीच घेणेदेणे नाही.
पण, त्या व्यासपिठावर कोणी गुंड आणि खंडणीखोर व अकोल्याच्या विकासात कोणी अडथळा अणणारा असेल तर लोखंडे यांचा प्रचार करायचा की नाही? याचा विचार करावा लागेल अशी चर्चा झाल्याचे कार्यकर्त्यांत सूर आहे.