Ahmednagar Politics : लोखंडेंची उमेदवारी रद्द न केल्यास करेक्ट कार्यक्रम करणार, महायुतीमधील नेत्यांचाच इशारा.. !

Ahmednagarlive24 office
Published:
sadashiv lokhande

Ahmednagar Politics :  अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय धुळवड आता चांगलीच उडू लागली असून उमेदवारांविषयी नाराज असणाऱ्या काही नेत्यांनी आपली राजकैय नाराजीही दाखवायला सुरवात केली आहे. एकीकडे दक्षिणेत सुजय विखे यांनी भाजप मधील नाराज मंडळींची नाराजगी काढल्याचे चित्र आहे.

तर दुसरीकडे उत्तरेत देखील राजकीय नाराजी नाट्य रंगले आहे. खा. लोखंडे यांच्यापुढे ही नाराजगी काढण्याचे आवाहन असणार आहे.

तर करेक्ट कार्यक्रम करणार…
निवडणूक असो वा जागा वाटपाचा कोणताही विषय असोे भाजपा रिपाईच्या कार्यकर्त्यांना तसेच नेत्यांना विचारात घेत नसल्याचा आरोप करत आम्ही फक्त यांचे झेंडे लावण्यासाठी आणि सतरंजा उचलण्यासाठी आहोत का? असा प्रश्‍न रिपाईच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी विचारत नाराजगी व्यक्त केली आहे.

लोकसभेच्या दोन जागा रिपाई मागत होती. किमान आठवले यांना शिर्डीची एक तरी जागा द्यायला हवी होती. परंतु आम्हाला गृहीत धरुन डावलले जात असल्याचा आरोप करत हे आम्ही खपून घेणार नसल्याचे सांगत सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी रद्द करा आणि ती आठवले यांना द्या अशी मागणी रिपाईने केली आहे.

तसेच राज्यभर रिपाई कार्यकर्ते भाजपाच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरेल, लोखंडेंची उमेदवारी रद्द केली नाही. तर, आम्ही करेक्ट कार्यक्रम करु अशी तंबी देखील या कार्यकर्त्यांनी दिली होती. एकंदर आठवले यांना डावलल्यामुळे रिपाईचे नेते फार नाराज आहेत.

आम्ही पाच वर्षे मतदारसंघात काम केले आहे. लोखंडे यांच्या पेक्षा आठवले निवडून येतील असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान राज्यात एकेकाळी सत्तेत कोणी बसायचे हे ठरविणारा रिपाई पक्ष एक जागेसाठी वंचित ठेवला आहे. रिपाईच्या नेत्यास उमेदवारी नाही याचे शल्य नेते व कार्यकर्त्यांना बोचत आहे हे यातून समोर आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe