Ahmednagar Politics : लोक नोट भी देते है ओर वोट भी ! लंकेच्या खोटेपणाची सोशल मीडियावर पोलखोल

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगरच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार, विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके जोरदार प्रचाराला लागले आहेत. दरम्यान महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

यामध्ये माजी आमदार निलेश लंके प्रसार माध्यमांशी बोलताना लोक नोट भी देते है और वोट भी देते है ! असं म्हणतं आहेत. निलेश लंके यांनी गोरगरीब जनता मला निवडणुकीसाठी आर्थिक मदत करत असल्याचे म्हटले आहे.

यावेळी त्यांनी खिशातून 500 आणि 100 ची नोट काढून आपल्याला एका लहान मुलीने खाऊसाठी जमा केलेले शंभर रुपये आणि एका शेतात काम करणाऱ्या महिलेने 500 रुपये निवडणुकीसाठी मदत दिल्याचे सांगितले आहे.

दरम्यान निलेश लंके यांच्या या व्हिडीओची अन वक्तव्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. या निमित्ताने त्यांनी मतदार संघात त्यांना भरभरून असे प्रेम मिळत असून लोक निवडणुकीसाठी त्यांना आर्थिक मदत करत असल्याचा दावा केला आहे.

मात्र लंके यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विखें समर्थकांकडून निलेश लंके यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला जात आहे. डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांकडून शेअर होत असलेला हा व्हिडिओ निलेश लंके हे पारनेरचे आमदार असतानाचा आहे.

पारनेरचे आमदार असताना निलेश लंके यांना मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके यांनी मावळ मधील एका कार्यक्रमात आमंत्रित केले होते. त्यावेळी लंके यांनी मावळमधल्या कार्यक्रमांमध्ये नेमके काय म्हटले होते याबाबतचा व्हिडिओ आता सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांकडून शेअर होत आहे.

या व्हिडिओत निलेश लंके तिकडे म्हणजे पारनेरमध्ये आमचे बरंय, लोकांना हात जोडले, लोकांच्या पायाला हात लावले तरी लोक माणूस एक नंबर हाय असं म्हणतात.

मात्र इकडे म्हणजेच मावळमध्ये तसे नाही असे म्हणतं मी जर इकडे असतो तर तुमच्या वडगाव नगरपरिषदेचा नगरसेवक देखील झालो नसतो, इथे हुशार लोक आहेत ना असे म्हटले आहे. यामुळे निलेश लंके यांच्या या जुन्या व्हिडिओची सध्या मोठी चर्चा होत आहे.

एकीकडे निलेश लंके हे सध्या लोकसभा प्रचारावेळी लोक मला वोट आणि नोट देतात असे म्हणत आहेत तर दुसरीकडे एका वर्षांपूर्वी त्यांनी मावळमध्ये जाऊन तेथील लोकांना हुशार म्हटले आणि नगर मधील लोकांना अप्रत्यक्षपणे का होईना पण अडाणी असल्याचे संबोधले. यामुळे सध्या निलेश लंके यांच्या आत्ताच्या आणि एका वर्षापूर्वीच्या जुन्या व्हिडिओची नगरमध्ये फार चर्चा पाहायला मिळतेय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe