Ahmednagar Politics : राजकीय भूकंप ! ‘या’ दिग्गजांची निलेश लंके यांना सोडचिठ्ठी

Ahmednagarlive24 office
Published:
nilesh lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेत निवडणुकीचा बिगुल वाजला अन अनेक घडामोडी घडायला सुरवात झाली. या काळात अनेक लोक नेत्यांची साथ सोडतात तर अनेक नावे भिडू येऊन मिळतात. या सर्व गोष्टी सुरूच असतात. परंतु आता निलेश लंके यांना पहिला फटका बसला आहे.

आमदार लंके यांचे कट्टर समर्थक दिग्गज मंडळींनी साथ सोडली आहे. आमदार लंके यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे पाडळी रांजणगावचे सरपंच विक्रमसिंह कळमकर व शिरपूरचे सरपंच भास्कर उचाळे यांनी लंके यांची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. त्यामुळे आता पारनेर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलू लागल्याचे चित्र आहे.

मुंबई येथे पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्ष पदी पाडळी रांजणगाव येथील सरपंच विक्रमसिंह कळमकर यांची तर युवक तालुका अध्यक्ष म्हणून शिरापुरचे सरपंच भास्कर उचाळे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी तेथे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रांताध्यक्ष खा सुनील तटकरे, अहमदनगर जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड, जेष्ठ नेते मधुकरराव उचाळे आदी उपस्थित होते.

नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष कळमकर, भास्कर शिरोळे यांच्या निवडीचे आ. संग्राम जगताप, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, माजी नगराध्यक्ष विजय औटी आदींनी अभिनंदन केले आहे. त्यामुळे आता राजकीय समीकरणे बदलू लागल्याचं चित्र आहे.

अजित पवार यांच्या तासभर गप्पा
अजित पवार यांनी पारनेर येथून गेलेल्या कार्यकर्त्यांना एक तासाचा वेळ दिला. त्यांच्याशी चर्चा केली. पारनेर तालुक्यातील राजकीय स्थितीबाबत कळमकर यांच्याकडून आढावा घेत आगामी राजकीय ध्येयधोरणाबाबत चर्चा केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe