Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराबाबत आज शेवट होईल. प्रकाहराच्या तोफा शांत होणार आहेत. त्यामुळे काल आणि आज अशा दोन दिवसांत प्रचार सभेचा तडाखा लावला जात आहे.
काल (१० मे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कर्जतमध्ये सभा झाली. यावेळी आ. राम शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आ. राम शिंदे यांचेही भाषण झाले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासमोरच आ. रोहित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले. ‘येथील स्थानिक लोकप्रतिनिधी नौटंकी करण्यात तरबेज आहेत असा टोला हाणला.
काय म्हणाले आ. शिंदे
कोणी मतदारसंघात आणले किंवा काही कामे आणली की ती कामे आपणच आणली हे सांगण्यात त्यांचा आटापिटा सुरू असतो. तसेच कर्जतच्या पाटेगाव एमआयडीसीत स्थानिक शेतकरी नाहीत. तेथे बाहेरचीच माणसे असल्याने त्यांचे भले करण्याचा घाट घातला होता असा गंभीर आरोप आमदार शिंदेंनी केला.
सुरु असणारी तुकाई चारी यांनी बंद पाडली. हायब्रीड रस्ताही यांच्यामुळेच पडला. कर्जत नगरपंचायतची निवडणुकीत दमबाजी केल्याचा आरोपही त्यांनी केला.
आरोग्य कार्ड मोदींचे व कव्हर मात्र येथील लोकप्रतिनिधीचे असे धंदे यांनी केलेत. असले राजकारण करून स्वताची पोळी भाजून घेण्याचा प्रकार लोकप्रतिनिधीने चालवला असल्याचेही ते म्हणाले.
अजित पवार यांनीही केली टीका
अजित पवार यांनीही रोहित पवारांवर टीकास्त्र सोडले. याने आधी मतदार संघतून पदयात्रा कादहत अडचणी समजावून घ्यायला पाहिजे होत्या. हा राज्यात पदयात्रा काढतोय.
याला राज्याचा नेता व्हायची घाई झाली. पण यामागे कुणीच नसल्याचेच पवार म्हणाले. तसेच मतदार संघातील कामे झाली ती म्हणजे मी अर्थमंत्री होतो म्हणून. मी जर नसतो तर रोहित पवार यांना मंदिरात घंटा वाजवत बसावं लागलं असत असे ते म्हणाले.