Ahmednagar Politics : शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत संगमनेरमध्ये जोरदार ‘राडा’ ! उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंसमोरच भिडले शिवसैनिक

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांची रणधुमाळी सुरु झाली आहे. शिर्डीमध्ये शिंदे गटाने खा. सदाशिव लोखंडे तर ठाकरे गटाने वाकचौरे यांना उमेदवारी दिली. परंतु आज (दि.३ एप्रिल) ठाकरे गटातील शिवसैनिकांतच बैठकीत जोरदार राडा झाला.

संगमनेर येथील एका कार्यक्रमात ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासमोरच हा सगळा प्रकार घडला. या प्रकरणानंतर शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असल्याचे बोलले जात आहे.  यावेळी झालेल्या राड्यात शिवसैनिकांनी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण देखील केली असल्याची चर्चा आहे. भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेनेत आल्याने संगमनेरचे शिवसैनिक आधीच नाराज होते व त्यांची ही खदखद अशा पद्धतीने बाहेर आली अशी चर्चा आहे.

कशाची नाराजगी ?
भाऊसाहेब वाकचौरे यांनी 2014 साली शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता. त्यानंतर अनेक शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला होता व त्याचाच राग शिवसैनिकांमध्ये असल्याने वाकचौरे यांना याच नाराजीचा सामना करावा लागत आल्याचे एका जाणकाराने सांगितले आहे.

आज नेमके काय घडले ?
भाऊसाहेब वाकचौरे याना ठाकरे गटाची लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याने ते आता कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांना एकत्रित केलेलं होते. अनेक कार्यकर्ते संगमनेरमध्ये एकत्र जमले होते.

बैठक सुरु असतानाच काही पदाधिकाऱ्यांनी जुने वाद उकरून काढत वाद झाला व दोन गट आमने-सामने आले. दोन्ही गटातील पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने काही कला गोंधळ उडाला.

भाऊसाहेब वाकचौरे यांनी वाद वाढू नये यासाठी मध्यस्थी करत गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न करत वातावरण शांत केले. दरम्यान या निमित्ताने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe