धमकीचे ‘लंके’राज : एका बाजूला साधेपणाची टिमकी ते दुसऱ्या बाजूला खुनशी कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा ! कार्यकर्त्यांमुळे निलेश लंके बॅकफूटवर

Ahmednagar Politics : सध्या अहमदनगरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण वेगळे वळण घेऊ पाहत आहे. नगर लोकसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून सुजय विखे हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना पहिल्यांदा संधी मिळालेली आहे. अजून या उभय नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याअगोदरच नगरचे राजकारण टोकाला पोहोचले आहे.

विखे आणि लंके यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वाना ज्ञात आहे. हा संघर्ष आता निवडणूक जवळ येत असल्याने टोकाला पोहचलाय. काल, लंके यांच्या समर्थकांनी विद्यमान खासदार सुजय विखे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. विखे यांना गोळ्या घालणारच अशी धमकी देत लंके समर्थकाने विद्यमान खासदारांसाठी शिवराळ भाषेचा वापर केला आहे.

खासदारांना गोळ्या मारण्याची धमकी देणे मुळात ही बाब खूपच संवेदनशील असून या प्रकरणात प्रशासनाणे अलर्ट होणे आवश्यक आहे. खरेतर, खासदार विखे यांना जीवे मारण्याची धमकी देण्याअगोदरही लंके समर्थकांनी जे लंके यांच्या विरोधात काम करतील त्यांचा तेरावा घालू अशी ओपन धमकी दिली होती. लंकेच्या कार्यकर्त्यांनी
जे लंके यांचा विरोध करतील त्यांचा तेरावा घालू अशी ओपन धमकी सोशल मीडियावर दिली होती.

लंकेसोबत कार्यक्रम असणाऱ्या एकाने देखील दोन-तीन दिवसांपूर्वी एका ग्रुपवर पाहून घेऊ असे म्हणत धमकीवजा इशारा दिला होता. यानंतर, काल एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये निलेश लंके प्रतिष्ठान मीडिया सेलचे अध्यक्ष यांनी पारनेर तालुक्यातील मौजे कळस येथील माजी उपसरपंच यांना धमकी देताना सुजय विखे पाटील यांना देखील गोळी मारू असे म्हटले आहे.

यामुळे सध्या ही ऑडिओ क्लिप संपूर्ण नगरमध्ये व्हायरल होत आहे. कळस गावातील माजी उपसरपंच यांनी एक मुलाखत दिली होती. यामध्ये सुजय विखे हे कळस गावातील 60% मतदान घेणार असे त्यांनी म्हटले. मात्र यामुळे निलेश लंके प्रतिष्ठान मीडिया सेलचे कार्यकर्ते कमालीचे भडकले आणि त्यांनी माजी उपसरपंचांना फोन करत या मुलाखतीबाबत जाब विचारला.

तसेच सुजय विखे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. एकंदरीत लंके समर्थक तेरावा घालू, पाहून घेऊ, गोळ्या घालू अशा ज्या धमक्या देत आहेत त्यावरून उमेदवारी अर्ज सादर होण्यापूर्वीच ते जनतेचे मालक अन त्यांचे ‘नेते’ त्यांच्यासाठी खासदार झाले आहेत, हे दिसतय. अजून खासदारकीचा अर्ज देखील भरला गेला नाही पण धमकीचे राजकारण मात्र सुरु झाले आहे.

एकीकडे निलेश लंके ज्यांना प्रेमाने त्यांचे कार्यकर्ते ‘नेते’ म्हणतात ते आपण एक सामान्य कार्यकर्ता असल्याचा आव आणतात. दुसरीकडे गोळ्या घालू अशी भाषा वापरणाऱ्या गुंडगिरी प्रवृत्तीलाही ते कुठेतरी संरक्षण देत असल्याचे पाहायला मिळतंय. पण जर हे असेच सुरू राहिले, कार्यकर्त्यांचा उद्दामपणा असाच चालू राहिला तर जनता-जनार्दन याचे उत्तर EVM वर बोट दाबून देईल एवढे मात्र नक्की आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe