Ahmednagar Politics : शिर्डीसह अहमदनगरमध्ये मतदान उत्साहात.. पहा सायंकाळी ५ वाजेपर्यंत कुठे किती मतदान झाले..

Ahmednagarlive24 office
Updated:
politics

 Ahmednagar Politics : आज (१३ मे) लोकसभेसाठी चौथाई टप्य्यात मतदान होत आहे. अहमदनगर व शिर्डी मतदार संघात सकाळपासूनच मतदानास सुरुवात झाली. राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहमदनगरमधेही सकाळीच मतदार राजा घराबाहेर पडला. शिर्डीतही मतदानास सुरवात झाली होती.

अहमदनगर मध्ये काय स्थिती
नगर शहरात सकाळी १० वाजेपर्यंत चांगले मतदान झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळी आठ वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळत होत्या यावरून उत्स्फूर्तपणा लक्षात येईल.

नगर शहरातील सावेडी उपनगरामध्ये सकाळी साडेसात वाजल्यापासूनच मतदारांनी गर्दी करण्यास सुरवात केली. सकाळच्या सत्रात मतदान करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसले. अहमदनगरमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत ५.१३ टक्के मतदान झाल्याचे पाहायला मिळाले.

अहमदनगरमध्ये पाच वाजेपर्यंत 53.27 टक्के मतदान
अहमदनगर मतदार संघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 50 टक्केच्या पुढे मतदान झाले आहे. यात सध्या कर्जत जामखेड आघाडीवर असून तेथे 57.20 टक्के मतदान झाले आहे. तर पारनेरमध्ये कमी 46.60 टक्के मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत झाले होते. आकडेवारी खालीलप्रमाणे –

शेवगाव – 54.18
राहुरी – 56.20
पारनेर – 46.60
अहमदनगर शहर – 54.50
श्रीगोंदे – 51.24
कर्जत जामखेड – 57.20

शिर्डीत किती मतदान?
शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळचा अंदाज जर घेतला तर सकाळी सावकाश पद्धतीने मतदान सुरु होते. अद्याप मतदार पाहिजे तेवढा बाहेर पडलेला नाही. शिर्डीची सकाळी नऊ वाजेपर्यंतची अंदाजे आकडेवारी आली होती त्यानुसार साडे सहा टक्के मतदान झाले होते.

संगमनेर तालुक्यात सर्वाधिक दहा टक्के मतदान नोंदवले गेले असल्याची माहिती मिळाली आहे. महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे व वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी सकाळीच बाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

शिर्डी मतदार संघात पाच वाजेपर्यंत किती मतदान
शिर्डी मतदारसंघात अहमदनगरपेक्षा जास्त मतदान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत 55.27% मतदान झाले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe