Ahmednagar Politics : विखे विरोधकांचा खा.लोखंडेंना फटका? भाजपचेच मातब्बर प्रचारात गैरहजर, लोखंडेंकडून सावरासावर

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe with lokhande

Ahmednagar Politics : अहमदनगर प्रमाणेच शिर्डीतही निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले आहे. खा. सदाशिव लोखंडे हे महायुतीचे उमेदवार असल्याने तेथे पालकमंत्री राधाकृष्ण् विखे यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. नुकतेच शिर्डीत महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा विखे यांच्या हस्तेच पार पडला.

परंतु इतर काही गणिते पाहता यावेळी भाजपचेच काही मातब्बर गैरहजर दिसले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी देखील येथे उपस्थित दाखवली पण कोपरगावचे भाजपचे विवेक कोल्हेच या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे. परंतु या घडामोडीनंतर खा. सदाशिव लोखंडे यांनी तेही सोबत येतील असे म्हणत पुष्टी जोडली आहे.

आमदार आशुतोष काळे म्हणतात आम्ही लीड देऊ..
यावेळी बोलताना आ. काळे यांनी लोखंडे यांना सहकार्याचा शब्द देत कोल्हे यांच्यावर अप्रत्यक्षपणे घणाघात केला. ते म्हणाले, प्रत्येक मतदारसंघातून मतांचं लीड देण्याची स्पर्धा सुरू असून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून महायुतीत असल्याने आम्ही तर सगळे प्रयत्न करणारच आहोत. मात्र आता कोण यात बरोबर आहे कोण नाही हे लोखंडे साहेबांनी पाहावे असे काळे यांनी विवेक कोल्हे यांचं नाव न घेता म्हटले आहे. आम्ही प्रामाणिकपणे काम करणारच आहोत असा शब्द आ. काळे यांनी दिला.

विखेंच्या नेतृत्वाखाली काम करणार
खासदार सदाशिव लोखंडे यांनी यावेळी वाकचौरे यांच्यावर टीका केली. माजी खासदारांनी खासदार निधी सोडून एकही काम केलं नसल्याचे ते म्हणाले. सदाशिव लोखंडे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना प्रश्न विचारला की, खसदार कामाचे होते तर खसदार निधी शिल्लक कसा राहिला,

याचे त्यांनी उत्तर द्यावे. सदाशिव लोखंडे पुढे म्हणाले की, २०१४ मध्ये मुरकुटे व काळे यांच्या सहकार्याने मी निवडून आलो. २०१९ मध्ये विखे साहेबांमुळे खासदार झालो व आता २०२४ मध्ये विखे काळे हे सोबत असल्याने विजय आमचा होईल असे ते म्हणाले. कोल्हेंबाबत अनेकांना शंका असल्या तरी ते मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पाठीशी राहतील असेही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe