Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये पुन्हा १९९१ ची पुनरावृत्ती होणार ? फरक इतकाच गडाखांच्या जागी लंके असतील…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar politics

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेची निवडणूक काल (१३ मे) पार पडली. अगदीच निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून तर अगदी कालपर्यंत ही निवडणूक चुरशीची होत गेली, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असणाऱ्या निवडक लढतीमधील ही लढत आहे. थोरामोठ्यांपासून तर अगदी बड्या नेत्यांपर्यंत या जागेवर लक्ष ठेऊन आहे.

ही निवडणूक तिचा निकाल अनेक समीकरणे बदलवणारा ठरेल असे म्हटले जात आहे. आता येत्या चार जूनला या मतदारसांघातील निवडणुकीचा निकाल लागेल. परंतु या निवडणुकीकडे जर पाहिले तर सुरवातीला काहीशा ठोकताळ्याने सुरु झालेली निवडणूक चुरशीची बनत गेली.

शेवटच्या दिवसांत काहीशी वेगळ्याच वळणावर पोहोचल्याचे दिसले. त्यामुळे आता ही निवडणूक झाली पण निकालानंतर पुन्हा १९९१ ची पुनरावृत्ती होऊ शकते असा अंदाज काही लोक बांधत आहेत. १९९१ ला विखे-गडाख यांच्या निकालाचा वाद न्यायालयात पोहोचला होता. हा खटला महाराष्ट्र्भर गाजला होता.

सध्या नागरिकांना मतमोजणी होईपर्यंत चर्चेसाठी काही खुराक पाहिजे असतो त्यामुळे अशा चर्चा झडतच असतात. पण ही नेमकी चर्चा काय आहे? काय शक्यता आहेत त्यांच्या चर्चेमागच्या, ते पाहुयात..

समोर आलेल्या विविध गोष्टी..
– निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात जर पाहिले तर त्यातील एक घटना म्हणजे पारनेरमधील वडझिरे येथील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला लंके समर्थकांनी पकडले व पैसे वाटप करण्याचा आरोप केला. तसा व्हिडिओही त्यांनी काढला व व्हायरल केला. यात रस्त्यावर पडलेले पैसे व ती कार देखील दिसत आहे.

दरम्यान त्या भाजप पदाधिकाऱ्यानेही लंके समर्थकांनी आपल्यावर हा आरोप केलाय व आपल्यालाच मारहाण केली असल्याचा प्रतिदावे केला. हे खरे असले तरी व्हिडिओत दिसणारी रक्कम तर खरी आहे मग ती रक्कम नेमकी कोठून आली? याची खमंग चर्चा नागरिक करतायेत.

– निवडणुकीच्या दिवशी आणखी एक व्हिडीओ समोर आला तो म्हणजे पाथर्डी मधील एका मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांकडेच महायुतीच्या उमेदवाराचे प्रचार पत्रके होती. त्यानंतर काही काळ मतदान बंद राहिले व नंतर ते कर्मचारी बदलून दुसरे कर्मचारी आल्यानंतर कामकाज सुरु झाले.

– त्याच दिवशी तिसरा एक व्हिडीओ समोर आला तो म्हणजे स्टेट बॅंकेजवळ काही लोकांच्या बोटांना बाहेरच शाई लावून पैसे देऊन मतदान न करताच बाहेरूनच पाठवून दिले जात होते. स्वतः निलेश लंके यांनी या घटनेचा पर्दाफाश केला व हा व्हिडीओ व्हायरल झाला.

तसेच त्यांनी हे लोक महायुतीच्या उमेदवाराचे कॉन्ट्रॅक्टर असून मुस्लिम व वंचित घटकांचे मतदान महाविकास आघाडीला होऊ नये म्हणून असे करत होते असा आरोप केला.

– एका प्रसिद्ध मीडियाने एका रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की त्यांची टीम जेव्हा मतदानाच्या दिवशी फिरत होती तेव्हा काही लोकांनी आम्हाला पैसे वाटले असे सांगितल्याचा आरोपही केलाय.

– निवडणुकीच्या काही दिवस अगोदर शहरातील एका हॉटेलवर लंके समर्थक पैसे वाटत असल्याचा व त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप विखे समर्थकांनी केला होता. तेही व्हिडीओ आमच्याकडे आहेत असे विखे समर्थक म्हणतात.

प्रशासन काय करत होते?
आता ही पारावर गप्पा हाणणारी मंडळी म्हणतेय की हे व्हिडीओ व्हरल होतायेत, स्वतः उमेदवार तेथे जातायेत मग हे प्रशासन का तेथे पोहोचू शकत नाही? हे प्रशासनाला काळात नाही का? की प्रशासन दुजाभाव करत आहे? असे प्रश्न ते एकमेकांना विचारतायेत.

१९९१ ची पुनरावृत्ती होणार?
लोक अशी चर्चा करत आहेत की या निवडणुकीचा निकाल काही असो , जर प्रशासनाच्या या दुजाभावाची विरोधात किंवा या व्हिडिओच्या आधारे जर उमेदवाराने निवणूक आयोगाकडे तक्रार केली, न्यायालयाची दारे ठोठावली तर मग पुन्हा एकदा १९९१ ची पुनरावृत्ती होणार का? फरक इतकाच राहील की गडाखांच्या जागी लंके असतील.. अशा चर्चा सध्या झडू लागल्या आहेत.

विखे घराणे हे सुसंस्कृत राजकारणी तर निलेश लंके हे देखील संयमशील नेते
एकंदरीतच एक महत्वाचे सर्वानी लक्षात घ्यायला हवे की हे राजकारण आहे. मतदान झाले आहे तर तेथेच आता सर्व कार्यकर्ते , मतदारांनी आपले राजकीय हेवेदावे सोडून द्यावेत. राहिला विषय उमेदवारांचा तर विखे घराणे हे सुसंस्कृत राजकारणी घराणे म्हणून ओळखले जाते. तर निलेश लंके हे देखील संयमशील नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे निकाल काही लागो, विजय कुणाचाही होवो हे दोघेही आलेला निकाल खिलाडीवृत्तीने स्वीकारतील हे मात्र नक्की.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe