आ. राम शिंदेंची नाराजगी दूर ! विखे पाटील- राम शिंदे यांची ‘सागर’ बंगल्यावर बैठक, फडणवीसांची ‘चाणक्य’नीती यशस्वी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खा.सुजय विखे व आ.राम शिंदे यांच्यात मोठा राजकीय संघर्ष आहे. मागील काही महिन्यांपासून विखे यांचा खुलेआम विरोध आ.शिंदे करत आहेत.

परंतु याचा फटका लोकसभेला बसू शकतो हे विखे यांच्या ध्यानी आल्याने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सागर बंगल्यावर जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आता काल रात्री (दि.२४) आमदार राम शिंदे यांनी सागर बंगल्यावर धाव घेतली.

या बैठकीत स्वतः खा.सुजय विखे पाटील. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः होते. या दोघांमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मध्यस्ती करत असून त्यांची ‘चाणक्य’नीती फलद्रुप होईल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

या बैठकीनंतर आ.राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना काही मुद्दे या बैठकीतील स्पष्ट केले आहे. यातून त्यांची नाराजगी दूर झाल्याचे दिसून येते.

 काय म्हणाले आ. राम शिंदे

मागील अनेक वर्षांपासूनचे विषय या बैठकीत मांडले. लोकसभेच्या निवडणुकीला आम्हाला उभे राहायचे होते. परंतु नेतृत्वाने उमेदवारीबात दुसरा निर्णय घेतला. मी भाजपचा कार्यकर्ता असल्याने नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य आहे.

परंतु या बैठकीनंतर अडचणीचं निराकरण झालं असल्याचे आ. राम शिंदे यांनी यावेळी म्हणाले. तसेच माझ्या मनातील प्रश्नांसाठी फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्ती केली असून हे दुःख कोणीतरी समजून घेतल असून यातच समाधान आहे व अशा नेतृत्वाचा आदेश मानला पाहिजे असे शिंदे म्हणाले.

आ. राम शिंदे यांची नाराजी संपली ?

नाराजगीबाबत शिइंडे म्हणाले, पक्षीय पातळीवर वाद मिटले असून वैयक्तिक मतभेद असले तरी निवडणुकीत ते काढायचे नसतात तर उलट पक्षाने दिलेला आदेश मानून लढायचे असते.

आजची बैठक यशस्वी झाली असून गळाभेट झाली नाही, मात्र हस्तांदोलन झालं आहे असाही सूचक वक्तव्य आ. राम शिंदे यांनी म्हटले आहे. एकंदरीतच त्यांची नाराजगी जवळपास दूर झाल्याचे चित्र आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe