मोठी बातमी ! एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, शिर्डीतून यांना मिळाली संधी

Tejas B Shelar
Published:

Eknath Shinde Official Candidate List : महाराष्ट्राच्या राजकारणातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये जो जागा वाटपावरून गदारोळ सुरू होता तो अखेरकार निकाली निघाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कारण की, आज शिवसेना एकनाथ शिंदे गटाने आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तथापि, अजूनही महायुतीमध्ये जागा वाटपावरून चर्चेचे सत्र सुरूच आहे. महायुतीमधील अजित पवार गट शिवसेना एकनाथ शिंदे यांचा गट आणि भारतीय जनता पक्षात जागा वाटपावरून चर्चा पे चर्चा सुरू आहे.

मात्र आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये आठ उमेदवारांची नावे आहेत. विशेष बाब अशी की यात अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचे देखील नाव आहे.

खरे तर शिर्डीची जागा ही शिंदे यांच्या गटालाच मिळणार अशा चर्चा होत्याच. मात्र मध्यंतरी या जागेसाठी रामदास आठवले यांनी इच्छा व्यक्त केली होती. तसेच मीडिया रिपोर्ट्स मध्ये मनसे महायुतीमध्ये आल्यानंतर शिर्डीची जागा मनसेला मिळणार आणि या जागेवरून मनसे बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देणार अशा चर्चा होत्या.

आज अखेर मात्र या सर्व चर्चा खोट्या ठरल्या असून शिर्डीची जागा शिंदे यांच्या गटाला मिळाली आहे. या जागेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्याचा मोठा निर्णय देखील घेतला आहे. खरे तर मतदारसंघांमध्ये लोखंडे यांच्या विरोधात नाराजी असल्याच्या चर्चा होत्या.

यामुळे भाजपा या जागेवरून उमेदवार बदलण्याची शिफारस शिवसेनेला करत असल्याचे म्हटले जात होते. परंतु पुन्हा एकदा लोखंडे यांना या जागेवरून उमेदवारी मिळाली असून आता आपण उर्वरित सात जागांवरील उमेदवारांची नावे अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शिवसेना पक्षातील अधिकृत उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ 

  • मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे
  • कोल्हापूर : संजय मंडलिक
  • शिर्डी अनुसूचित जाती : सदाशिव लोखंडे
  • बुलढाणा : प्रतापराव जाधव
  • हिंगोली : हेमंत पाटील
  • मावळ : श्रीरंग बारणे
  • रामटेक अनुसूचित जाती : राजू पारवे
  • हातकणंगले : धैर्यशील माने 
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe