Ahmednagar Politics : निवडणुकी इतकीच सट्टाबाजारातही विखे-लंके यांच्यात चुरस, एकास दोन, तीनचा भाव, कोण किती कमवेल?

Ahmednagarlive24 office
Published:
lanke vikhe

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे दहा उरलेले आहेत. निवडणुकीमध्ये निलेश लंके व खा. सुजय विखे यांच्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. दरम्यान आता ही चुरस सट्टाबाजारातही पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके व खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यावर सट्टा लावला जात असून सट्टाबाजार चांगलाच तेजीत आला असल्याचे लोक चर्चा करत आहेत. निवडणुकीत विजयाची शक्यता असलेल्या उमेदवारासाठी एकास एक म्हणजे १०० रुपयांना २०० रुपयांचा भाव आहे, तर पराभवाची शक्यता असलेल्या उमेदवारांवर पैसे लावल्यास १०० रुपयांना ३०० रुपयांचा भाव असल्याचे काही लोक खासगीत बोलत आहेत.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात विखे व लंके यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामुळे निकालाबाबत उत्सुकता आहे. दोन्ही उमेदवारांवर सट्टेबाजारात पैसे लावले जात आहेत. दोघांमध्ये जोरदार रस्सीखेच असल्याने सट्टाबाजारातही विजयाबाबत संभ्रम आहे असे लोक खासगीत बोलतायत.

उलाढाल मोठी
”अरे भाऊ , सट्टा बेकायदेशीर असले, तरी क्रिकेटप्रमाणे निवडणुकीच्या निकालावरही मोठ्या प्रमाणात सट्टा लागतो. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्यात यावेळी चुरशीची लढत झाल्याने सट्टाबाजार चांगलाच तेजीत आलाय” अशी चर्चा लोक पारावर बसून करतायेत.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कोण जिंकणार, याबाबत अंदाज बांधले जात आहेत. सट्टा लावण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. दोन्ही उमेदवारांवर मोठा सट्टा लावला जात असल्याने सट्टेबाज मालामाल होणार की, सट्टा लावणारे, हे निकालानंतरच स्पष्ट होईल असेही लोक म्हणतायेत.

पैजा तेही लाखोंच्या..?
लोकसभेला कोण बाजी मारणार विखे की लंके, याची सर्वत्र चर्चा आहे. गावोगावच्या पारावरही कोण जिंकणार, हीच चर्चा आहे. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा दावा केला जात असून, पैजा लावण्यासाठी हात पुढे केले जात आहेत. दोन्ही उमेदवारांवर पाच हजारांपासून ते लाखापर्यंत पैजा लागल्या असल्याचेही ऐकिवात येतेय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe