महाविकास आघाडीचा ४८ जागांचा फॉर्म्युला फायनल ! पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर, कोणती जगाला कोणाला? पहा एक क्लिकवर

Maharashtra News : लोकसभा निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळणार आहे. एकीकडे महायुती व दुसरीकडे महाविकास आघाडी असणार आहे. मतदानाच्या तारखा जवळ येऊन ठेपल्या असल्या तरी महायुती व महाविकास आघाडीचे अनेक ठिकाणचे उमेदवार अद्याप ठरलेले नव्हते.

आता महाविकास आघाडीचा राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा फॉर्म्युला ठरला असून आजच्या (दि.९ एप्रिल) पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीने जागावाटप जाहीर केले. मुंबईमध्ये शिवसेना उद्धवठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली.

शिवसेना उद्धवठाकरे गटाचे संजय राऊतांनी हे जागावाटप जाहीर केले असून यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आदींसह प्रमुख नेते यावेळी येथे होते. यामध्ये ४८ पैकी २१ जागा शिवसेना, १७ जागा काँग्रेसला, तर १० जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात आल्या आहेत.

शिवसेना – २१ जागा

शिवसेनेला ज्या २१ जागा सोडण्यात आल्या आहेत त्यामध्ये जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड या जागेंसोबतच मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलडाणा, हातगकणंगले, संभाजी नगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई इशान्य आदी जागांचा समावेश आहे.

काँग्रेस- १७ जागा

काँग्रेसला यामध्ये १७ जागा सोडण्यात आल्या असून यामध्ये नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गडचिरोरी या जागेंसोबतच चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई आदी जागांचा समावेश आहे.

शरद पवार गट- १० जागा

बारामती, शिरुर, अमहमदनगर दक्षिण या जागा सर्वांनाच माहिती होत्या. याबरोबर सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, बीड या जागाही शरद पवार यांच्या गटाला मिळालेल्या आहेत.

वंचित सोबत नाहीच

महाविकास आघाडीबरोबर वंचित बहुजन आघाडी सोबत येईल असे वाटत होते. परंतु आता जागावाटपाबरोबरच या शक्यताही मावळल्या आहेत.