हेलिकॉप्टरने आले, कॉलर उडवून फ्लाईंग किस..मुंडेंच्या आठवणीने रडलेही..! पंकजा मुंडेंच्या सभेत उदयनराजेंचीच हवा

Ahmednagarlive24 office
Published:
udayan raje

लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे ला होणार आहे. त्यामुळे आज सायंकाळी (११ मे) प्रचाराच्या तोडा थंडावतील. आज शेवटचा दिवस असल्याने सर्वत्र प्रचारसभांचा धुराळा उडालेला दिसला.

आज बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्यासाठी स्वत: उदयनराजे भोसले मैदानात उतरलेले दिसले. त्यांनी आज बीडमधील सभा गाजवली. देशातील विकासकामे पाहता बीड जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लागवण्यासाठी मोदींना साथ देण्याचे आवाहन केले.

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन वातावरण तापलेले असल्याने पंकजा मुंडेंकडून थेट छत्रपती उदयनराजेंना प्रचाराच्या मैदानात उतरवल्याचे पाहायला मिळाले.

माझ्या बहिणीला निवडून द्या…
उदयनराजे हेलिकॉप्टरनमधून परळीत आले त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झालेली होती. यावेळी भाषणासाठी उभे असलेल्या उदयनराजेंनी बीडकरांना हात जोडून, खाली वाकून पंकजा यांना माझ्या बहिणीला निवडून द्या असे आवाहन केले.

यावेळी ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. उदयनराजेंनी हात जोडल्यानंतर उपस्थितांनी त्यांच्या कॉलर उडवण्याची मागणी केली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उदयनराजेंनी बीडमध्येही कॉलर उडवली आव कार्यकर्त्यांनी टाळ्या व शिट्ट्यांच्या गजरात जल्लोष केला.

कार्यकर्त्यांचे हे प्रेम पाहून उदयनराजेंनी पुन्हा एकदा फ्लाइंग किस देऊन सर्वांची मने जिंकली. यावेळी त्यांनी भावनिक साद घालत ते म्हणाले, तुम्ही माझ्या बहिणीला निवडून द्या नाहीतर मी राजीनामा देतो आणि साताऱ्यातून निवडून आणतो असे ते म्हणाले.

भावुक वातावरण
यावेळी सभेत उदयनराजे भोसले यांनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढत ‘ माझ्या वडिलासमान आदरणीय, वंदनीय असे माझे मित्र गोपीनाथजी मुंडे यांना वंदन करतो’ असे म्हणाले व हे म्हणत असतानाच त्यांना गहिवरून आले.

त्याचवेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे या देखील भावुक झल्या व त्यांच्याही आश्रूचाही फुटला व या घडामोडींमुळे सभेचे वातावरण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe