भारतातील सर्वात श्रीमंत खासदार कोण ? सर्वाधिक संपत्ती असलेले टॉप 10 खासदारांची यादी !

Tejas B Shelar
Published:
Lok Sabha Election

Lok Sabha Election : भारतात सध्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. खऱ्या अर्थाने आता लोकशाहीचा महाकुंभ सजला आहे. भारतात 19 एप्रिल पासून लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. देशात एकूण सात टप्प्यात आणि महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणुका पार पाडल्या जाणार आहेत.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात राजकीय पक्षांच्या माध्यमातून आप-आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. राज्यातील जवळपास सर्वच पक्षांनी आपल्या काही अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

महायुती मधील मित्रपक्षांनी आणि महाविकास आघाडी मधील मित्र पक्षांनी हळूहळू आपापले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या माध्यमातून आणि ज्यांना उमेदवारी मिळण्याची आशा त्यांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे.

दरम्यान आज आपण आगामी खासदारकीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतातील सर्वाधिक श्रीमंत खासदारांची यादी पाहणार आहोत.  2019 च्या लोकसभा निवडणुकीनुसार देशातील सर्वाधिक संपत्ती असलेले टॉप 10 खासदार कोणते आहेत, देशातील सर्वाधिक श्रीमंत खासदार कोण ? याविषयी आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

देशातील सर्वाधिक श्रीमंत खासदार कोण?

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे चिरंजीव खासदार नकुलनाथ हे देशातील सर्वाधिक श्रीमंत खासदार आहेत. गेल्या निवडणुकीत ते सर्वात श्रीमंत खासदार होते. 2019 मध्ये झालेल्या सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत रिंगणात उतरलेले नकुलनाथ यांच्याकडे त्यावेळी 660 कोटी रुपयांची प्रॉपर्टी होती.

विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या प्रॉपर्टी मध्ये आणखी 40 कोटी रुपयांची भर पडली आहे. अर्थातच त्यांच्याकडे सातशे कोटी रुपयांची प्रॉपर्टी असून ते देशातील सर्वात श्रीमंत खासदार म्हणून ओळखले जात आहेत.

सर्वाधिक श्रीमंत असलेले देशातील टॉप 10 खासदार 

मध्यप्रदेश मधील छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातील खासदार नकुलनाथ हे सर्वाधिक श्रीमंत खासदार आहेत. त्यांच्याकडे 660 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे.

कर्नाटक मधील बंगळुरू ग्रामीण लोकसभा मतदारसंघातील डिके सुरेश हे या यादीत दुसऱ्या स्थानावर विराजमान असून त्यांच्याकडे 338 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

आंध्र प्रदेश राज्यातील नरसापुरम लोकसभा मतदारसंघातील के आर आर कृष्ण राजू हे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे 325 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर लोकसभा मतदारसंघातील जयदेव बोला हे या यादीत चौथ्या क्रमांकावर विराजमान असून त्यांच्याकडे 305 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील मथुरा लोकसभा मतदारसंघातील हेमा मालिनी हे या यादीत पाचव्या क्रमांकावर विराजमान असून त्यांच्याकडे 250 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील बिजनोर लोकसभा मतदारसंघातील मलूक नागर हे या यादीत सहाव्या क्रमांकावर विराजमान असून त्यांच्याकडे 249 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

आंध्र प्रदेश राज्यातील नेल्लोर लोकसभा मतदारसंघाचे ए. प्रभाकर रेड्डी हे या यादीत सातव्या क्रमांकावर विराजमान असेल त्यांच्याकडे 221 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

पंजाब राज्यातील फिरोजपुर लोकसभा मतदारसंघातील सुखबीर सिंग बादल यांच्याकडे 217 कोटी रुपयांची संपत्ती असून ते आठव्या क्रमांकावर आहेत.

पंजाब राज्यातील भटिंडा लोकसभा मतदारसंघातील हरसिमरत कौर बादल यांच्याकडे सुद्धा 217 कोटी रुपयांची संपत्ती असून ते नवव्या क्रमांकावर आहेत.

आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापटनम येथील खासदार या एमव्हीव्ही सत्यनारायण यांच्याकडे 203 कोटी रुपयांची संपत्ती असून ते दहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत खासदार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe