उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची पहिली यादी जाहीर ! शिर्डीतून कोणाला मिळाली संधी ?

Published on -

Loksabha Election : महाराष्ट्राच्या राजकारणातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाविकास आघाडी मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली आहे.

खरेतर गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना लवकरच आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करणार अशा चर्चा होत्या. मात्र याला मुहूर्त मिळत नव्हता.

आजअखेर उबाठा शिवसेनेला याचा मुहूर्त मिळाला आहे आणि आज पक्षाने अधिकृतरित्या आपल्या 16 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचे देखील नाव आहे.

यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उबाठा शिवसेना पक्षाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान आता आपण उबाठा शिवसेना पक्षाच्या सर्वच्या सर्व सोळा अधिकृत उमेदवारांची नावे आणि त्यांचे मतदार संघ कोणत्या आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत. 

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि त्यांचे मतदार संघ 

1) बुलढाणा : प्रा. नरेंद्र खेडेकर

2) यवतमाळ : वाशिम : श्री. संजय देशमुख

३) मावळ : श्री. संजोग वाघेरे पाटील

४) सांगली : श्री. चंद्रहार पाटील

५) हिंगोली : श्री. नागेश पाटील आष्टीकर

६) संभाजीनगर : श्री. चंद्रकांत खैरे

७) धारशीव : श्री. ओमराजे निंबाळकर

८) शिर्डी : श्री. भाऊसाहेब वाघचौरे

९) नाशिक : श्री. राजाभाऊ वाजे

१०) रायगड : श्री. अनंत गीते

११) सिंधुदुर्ग – रत्नागिरी : श्री. विनायक राऊत

१२) ठाणे : श्री. राजन विचारे

१३) मुंबई – ईशान्य : श्री. संजय दिना पाटील

१४) मुंबई – दक्षिण : श्री. अरविंद सावंत

१५) मुंबई – वायव्य : श्री. अमोल कीर्तिकर

१६) परभणी : श्री. संजय जाधव

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe