Maharashtra Assembly Exit Poll : शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राजळे यांची हवा! बंडखोरीनंतरही हॅट्रिक निश्चित

या मतदारसंघात खरे तर बहुरंगी लढत पाहायला मिळाली. महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार मोनिका राजळे, महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे प्रतापराव ढाकणे, अपक्ष म्हणून चंद्रशेखर घुले आणि हर्षदा काकडे निवडणुकीच्या रिंगणात होते. चंद्रशेखर घुले यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली नाही यामुळे त्यांनी बंडखोरी केली.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Assembly Exit Poll

Maharashtra Assembly Exit Poll : मतदानानंतर आता कुणाचे सरकार येणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. उद्या अर्थातच 23 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि या मतमोजणी मध्ये महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार हे क्लिअर होईल. मात्र त्याआधीच विविध संस्थांचे एक्झिट पोल देखील समोर येत आहेत. काही एक्झिट पोल महाविकास आघाडीचे सरकार बनणार तर काही एक्झिट पोल महायुतीचे सरकार बनणार असा अंदाज देताना दिसतायेत.

दरम्यान काही एक्झिट पोल मध्ये मतदार संघानुसार कोण विजयी ठरणार याबाबतही अंदाज देण्यात आले आहेत. अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर या मतदारसंघाचा देखील एक्झिट पोल समोर आला आहे.

या मतदारसंघात खरे तर बहुरंगी लढत पाहायला मिळाली. महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार मोनिका राजळे, महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे प्रतापराव ढाकणे, अपक्ष म्हणून चंद्रशेखर घुले आणि हर्षदा काकडे निवडणुकीच्या रिंगणात होते. चंद्रशेखर घुले यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली नाही यामुळे त्यांनी बंडखोरी केली.

महायुतीमध्ये झालेली ही बंडखोरी निश्चितच मोनिका राजळे यांचे टेन्शन वाढवणारी होती. दुसरीकडे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कट्टर समर्थक हर्षदा काकडे त्यांनीही अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतल्याने अन शरद पवार गटाचे प्रतापराव ढाकणे हे गेल्या वर्षभरापासून निवडणुकीची तयारी करत असल्याने राजळे यांच्यासाठी यंदाची निवडणूक नक्कीच सोपी नव्हती.

मात्र असे असले तरी शांत आणि संयमी स्वभावाच्या राजळे यांनी या आव्हानांवर यशस्वी मात केलेली दिसते. कारण की एक्झिट पोल मध्ये पुन्हा एकदा राजळेचं विजयी होणार असा अंदाज व्यक्त होतोय. महायुतीमध्ये बंडखोरी झालेली असतानाही राजळे पुन्हा एकदा विजयाची पताका फडकवणार आणि शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात हॅट्रिक करणार असा अंदाज एक्झिट पोलने बांधला आहे.

एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली असल्याने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या खेम्यामध्ये मोठे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पण हा फक्त एक्झिट पोलचा अंदाज आहे. यामुळे हाच अंदाज प्रत्यक्षात खरा ठरणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe