Maharashtra Loksabha Election : भारतात लवकरच 18 व्या लोकसभेसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारी देखील सुरू झाली आहे. खरेतर, 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जूनला पूर्ण होणार आहे. यामुळे हा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच देशात लोकसभेच्या निवडणुका घेणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.
राजकीय पक्षांच्या माध्यमातून संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली जात आहे, तर काही राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे. भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत, आता लोकसभेचे मतदान कधी होणार ? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान आता आपण याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
लोकसभेच्या तारखा केव्हा जाहीर होणार
मिळालेल्या माहितीनुसार, 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. आता फक्त तारखांची घोषणा होणे बाकी आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर भारतीय निवडणूक आयोग 14 किंवा 15 मार्च 2024 ला आगामी अठराव्या लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.
अद्याप लोकसभा निवडणुकांचा तारखा जाहीर झालेल्या नाहीत. मात्र गत चार पंचवार्षिकीचा विचार केला असता 14 किंवा 15 मार्चला यंदा लोकसभा निवडणूकांची घोषणा होईल असा दावा केला जात आहे. तसेच गेल्या तीन ते चार लोकसभा निवडणुकांच्या आधारावर निवडणुका कोणत्या तारखेला आयोजित होऊ शकतात याचा अंदाज सुद्धा बांधला जाऊ शकतो.
मतदानाच्या किती दिवस आधी निवडणुकीची घोषणा होते ?
2004 पासून ते 2019 पर्यंतच्या चार निवडणुकांचा कालावधी पाहिला असता निवडणूक आयोग मतदानाच्या 40 ते 50 दिवस आधी निवडणुकीची घोषणा करत असते. म्हणजेच प्रत्यक्ष मतदानाच्या 40 ते 50 दिवस आधीच लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होतात.
ज्या दिवशी निवडणुकांच्या तारखा जाहीर होतात त्याच दिवशी आचारसंहिता देखील लागू होत असते. गेल्या निवडणुकीचा अर्थातच 2019 मधील 17 व्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला असता 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान सात टप्प्यात निवडणुका पार पडल्या होत्या.
तसेच निवडणुकीचा निकाल 23 मे 2019 ला जाहीर झाला होता. 2014 आणि 2009 मध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. यामुळे यंदा देखील पहिल्या आठवड्यातच लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
2024 मध्ये 18 व्या लोकसभेसाठी निवडणुका कधी ?
अठराव्या लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा अजूनही जाहीर झालेल्या नाहीत. मात्र गेल्या चार पंचवार्षिकेचा विचार केला असता यावेळीही एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच निवडणुका सुरू होतील असा अंदाज आहे. यावेळीही एप्रिल ते मे यादरम्यान मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार असा अंदाज आहे. यंदाच्या निवडणुका पाच किंवा सात टप्प्यात होणार असे बोलले जात आहे.
महाराष्ट्रात मतदान कधी होणार ?
ज्या राज्यात लोकसभेच्या अधिक जागा आहेत तिथे एकापेक्षा अधिक टप्प्यात मतदान होते. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये एकापेक्षा अधिक टप्प्यात मतदान होत असते. छोट्या राज्यात मात्र एक किंवा दोन टप्प्यात मतदान आवरले जाते. गेल्या काही निवडणुकांवरून आपल्या महाराष्ट्रात एकूण चार टप्प्यात मतदान होईल असा अंदाज आहे. राज्यात सुरुवातीच्या चार टप्प्यातच मतदान होण्याची आशा आहे.
निकाल केव्हा जाहीर होणार ?
शेवटच्या टप्प्यातील निवडणुका झाल्यात की लगेचच एका आठवड्यात निवडणुकीचा निकाल जाहीर केला जात असतो. 2019 च्या 17 व्या लोकसभेच्या निवडणुकीत 23 मे ला मतमोजणी अर्थातच निकाल जाहीर झाला होता. 2004 मध्ये मात्र 13 मे ला, 2009 मध्ये 16 मे ला, 2014 मध्ये देखील 16 मे ला निकाल जाहीर करण्यात आला होता. यामुळे 2024 च्या आगामी लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल देखील 13 मे ते 23 मे दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.