Maharashtra Politics : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. यामुळे आता लवकरच 18 व्या लोकसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यासाठी निवडणूक आयोगाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी देखील जय्यत तयारी सुरू केली आहे. उमेदवार फायनल करून उमेदवारांची नावे जाहीर करण्यासाठी राजकीय पक्षांची धडपड पाहायला मिळत आहे.
मात्र अजून महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आप-आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. मात्र लवकरच महायुती आणि महाविकास आघाडी जागा वाटपाचा तिढा सोडवणार आणि अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करणार असे सांगितले जात आहे.
तत्पूर्वी मात्र उद्धव ठाकरे यांनी एक मोठी राजकीय खेळी खेळली आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे. खरे तर महाविकास आघाडीतील महाराष्ट्रातील अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत.
मात्र असे असले तरी उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटातील पहिल्या उमेदवाराचे नाव जाहीर करून टाकले आहे. यामुळे मात्र आगामी लोकसभेत बाप विरुद्ध बेटा अशी लढत पाहायला मिळणार आहे.
उद्धव ठाकरे यांची मोठी राजकीय खेळी
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, उद्धव ठाकरे यांनी मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून उबाठा शिवसेनेचा उमेदवार जाहीर केला आहे. उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांना या जागेवरून तिकीट दिले आहे.
सध्या स्थितीला या मतदारसंघातून शिंदे गटातील गजानन कीर्तिकर हे खासदार आहेत. दरम्यान या जागेवरून उद्धव ठाकरे यांनी अर्थातच शनिवारी गजानन कीर्तिकर यांच्या मुलाला अर्थातच अमोल कीर्तीकर यांना तिकीट देण्याचे जाहीर केले आहे.
यामुळे उद्धव ठाकरे यांनी मोठी राजकीय खेळी खेळली असल्याच्या चर्चा आहेत. या जागेवरून आता पिता-पुत्रांमध्ये लढत रंगणार आहे. खरे तर या जागेवर गजानन कीर्तीकर यांचा मोठा बोलबाला आहे. त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये या जागेवरून विजयी पताका फडकवली आहे.
विशेष म्हणजे गजानन कीर्तिकर यांना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून पुन्हा येथील उमेदवारी मिळणार असे संकेत मिळू लागले आहेत. यावेळी मात्र गजानन कीर्तिकर यांना विजयी पताका फडकवण्यासाठी आपल्या मुलालाच पराभूत करावे लागणार आहे.
यामुळे या जागेवरील लढत ही निवडणुकीपूर्वीच रंगतदार बनली आहे. तथापि, उद्धव ठाकरे यांनी या जागेवर उमेदवार जाहीर केला असला तरी देखील महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा पेच अजूनही कायमच आहे. येत्या काही दिवसात मात्र हा पेच निकाली निघणार अशी शक्यता आहे.