Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ! शिर्डीत लोखंडेंविरोधात व कल्याणमध्ये शिंदेंविरोधात आता दिले ‘हे’ तगडे उमेदवार

Ahmednagarlive24 office
Published:
udhav thackeray

Maharashtra Politics : मतदानाच्या तारखा जवळ येऊ लागलेल्या असल्या तरी अनेक ठिकाणचे महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप निश्चित नाहीत. यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मात्र आघाडी घेतली आहे. त्यांनी आपले २१ उमेदवार जाहीर केलेत. आज त्यांनी दुसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीत १७ उमेदवारांचे नावे होती. आज दुसरी यादी जाहीर झाल्याने २१ उमेदवार फायनल झाले असून कल्याण, शिर्डीसह अनेक ठिकाणच्या लढती आता फायनल झाल्या आहेत.

यामध्ये कल्याण मतदार संघात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. त्यामुळे येथे कोणता उमेदवार असेल याबाबत अनेकांना उत्सुकता होती. येथे आता वैशाली दरेकर यांना उद्धव ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. महत्त्वाचे म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्यजीत पाटील यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिल्याने येथे तिरंगी लढत होईल.

शिर्डी मध्ये शिंदे गटाचे खा. सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात पहिल्या यादीत भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव होते. आताहितेचं नाव कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ही लढत आता फायनल मानली जात आहे.

ठाकरे गट उमेदवार यादी खालील प्रमाणे
बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ-वाशिममधून संजय देशमुख, मावळमधून संजोग वाघेरे-पाटील, सांगलीमधून चंद्रहार पाटील, हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीमधून भाऊसाहेबर वाघचौरे, नाशिकमधून राजाभाई वाजे,

रायगडमधून अनंत गीते, सिंधुदुर्ग-रत्नागिरीमधून विनायक राऊत, ठाणेमधून राजन विचारे, मुंबई-ईशान्यमधून संजय दिना पाटील, मुंबई-दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई-वायव्यमधून अमोल कीर्तिकर, परभणीमधून संजय जाधव, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई , कल्याणमधून वैशाली दरेकर , हातकणंगलेमधून सत्यजीत पाटील, पालघरमधून भारती कामडी, जळगावमधून करण पवार

राज्यात विविध राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता
दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी शक्यता दिसते. याचे कारण असे की महायुती मध्ये अनेक विद्यमान खासदारांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे अनेक बंडखोर महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आगामी काळात एक वेगळेच चित्र दिसेल असे म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe