Mharashtra Politics : बीडमध्ये पंकजा मुंडेंविरोधात शरद पवारांकडून मेटे नव्हे तर ‘हा’ हुकमी पत्ता ! दुसरी यादी आज जाहीर

Ahmednagarlive24 office
Published:
munde

 Mharashtra Politics : आज (दि.४) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपली लोकसभेसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झालीये. यामध्ये अनेक लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान बीड मतदार संघात भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्याविरोधात कुणाला उभे केले जाणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या.

येथे शरद पवार गट ज्योती मेटे याना उमेदवारी देईल अशी चर्चा होती. कारण येथे मराठा आरक्षणावरून जे आंदोलन पेटले होते त्यावरून मतांच्या गणितासाठी येथे मेटे यांना उमेदवारी दिली जाईल असा अंदाज बांधला जात होता. परंतु शरद पवार यांनी येथे बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

तर दुसरी महत्वाची जागा भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी बाळ्या मामा यांना उमेदवारी दिली आहे. पहिल्या यादीला पाच आणि आता दोन अशा सात नावांची घोषणा शरद पवार गटाने केली आहे. आगामी लोकभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीये.

पहिल्या यादीत वर्धामधून अमर काळे, दिंडोरीमधून भास्करराव भगरे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके आदींना उमेदवारी जाहीर झाली. दुसऱ्या यादीत बजरंग सोनवणे हे बीडमधून तर भिवंडी लोकसभा मतदारसंघामधून बाळ्या मामा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

बीडकडे सर्वांचे लक्ष
बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पंकजा मुंडे या उभ्या आहेत. त्यामुळे शरद पवार गटाकडून तेथे उमेदवारी मिळवण्यासाठी ज्योती मेटे आणि बजरंग सोनावणे हे दोघेजण इच्छूक असल्याची माहिती समजली होती. येथे मराठा आंदोलन तापल्याने मतांचे गणित व मतांचे विभाजन या गोष्टी महत्वपूर्ण ठरणार होत्या.

त्यामुळे शरद पवार गट कुणाला संधी देतो याकडे सर्वांचे लक्ष होते. येथे ज्योती मेटे यांनी संधी मिळेल असे वाटत असतानाच आता बजरंग सोनावणे यांना तिकीट दिले आहे. सोनावणे यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी असलेली यंत्रणा आणि क्षमता तसेच मागील वेळी दिलेली टक्कर पाहता त्यांना बीडमधून उमेदवारी दिली असल्याची चर्चा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe